मुंबई | बांद्रा कुर्ला क्रीडा संकुलात होणाऱ्या सराव शिबीरासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने आधी निवडलेल्या २७ खेळाडूंमध्ये आणखी ७ सात खेळाडूंची निवड केली आहे.
यामध्ये शुभम रांजने, शशांक सिंग, अकिंत सोनी, अल्पेश रमजानी, प्ररिक्षीत वळसंगकर, प्रसाद पवार आणि अदित्य धुमाळ यांचा समावेश आहे.
याची माहिती भारताचा माजी अष्टपैलू क्रीकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकरने मंगळवारी (६ ऑगस्ट) दिली.
येत्या रणजी क्रिकेट स्पर्धात आणि देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाची चांगली कामगिरी व्हावी या दृष्टीने हे सराव शिबिर आयोजीत केले आहे.
यामध्ये अदित्य तारे, सुर्यकुमार यादव आणि सिद्धेश लाड या वरिष्ठ खेळाडूंना संधी मिळाली असली तरी ३५ वर्षीय अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायरला या सराव शिबिरासाठी डावलण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-इंग्लंड येणार गोत्यात?, महत्त्वाचा खेळाडू अडकला कायद्याच्या कचाट्यात
-स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल