---Advertisement---

‘कोणालाही वाटलं नव्हतं आम्ही IPL प्ले-ऑफमध्ये पोहोचू’, गुजरातच्या मॅचविनर खेळाडूची प्रतिक्रिया

Shubman-Gill-And-David-Miller
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १५वा हंगाम नुकताच संपन्न झाला. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स या नवख्या संघाने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. मात्र, ‘आम्ही प्ले-ऑफमध्ये पोहोचू इतका विश्वासही कोणालाच नव्हता,’ असं संघाचा सलामीवीर शुबमन गिल याने सांगितले आहे. शुबमनच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

“यंदाचा हंगाम आमच्यासाठी विशेष होता. अनेकदा आम्हाला वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. सोबतच आयपीएल विजयी होण्याप्रमाणे अनेक आनंदाचे क्षणही आम्हाला अनुभवायला मिळाले. हंगामाच्या सुरुवातीला अनेक जणांनी आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू की नाही?, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, आम्ही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत चांगला खेळ करम्याचा प्रयत्न करत राहिलो,” असं म्हणत शुबमनने विजयाचा आनंद व्यक्त केला.

शुबमनने त्याच्या कारकिर्दीत होणाऱ्या सकारात्मक बदलांचे श्रेय आयपीएलला दिले आहे. शुबमन म्हणाला की, “आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे, जिथे प्रत्येक खेळाडू संघाला अपेक्षित खेळी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. जेव्हा तुम्ही विजयी पक्षात असता, तेव्हा तुम्ही निश्चितपणे आणखी चांगल करण्याच्या प्रयत्नात असता, तर जेव्हा तुमच्या हिस्स्यांत पराभव येतो, तेव्हा तुम्ही तुमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असता.”

दरम्यान, शुबमनने यंदाच्या हंगामात गुजरातसाठी धडाकेबाज सलामीवीर म्हणून चोख भूमिका बजावली. त्याने एकूण १६ सामन्यांत ४ अर्धशतकांच्या मदतीने ४८३ धावा केल्या. यावेळी शुबमनचा स्ट्राईक रेट १३२.३२, तर सरासरी ३४.५० इतकी होती. आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात शुबमनने महत्तवपूर्ण ४३ चेंडूत ४५ धावांची महत्तवपूर्ण खेळी केली आणि गुजरातच्या विजयांच आपले योगदान दिले.

व्हॉट्स्पवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मी पैज लावू शकतो की, तो ११० शतक करेल’, भारतीय नाही; तर पाकिस्तानी दिग्गजाचा विराटवर विश्वास

…तर भारत ६ ओव्हर्स मध्ये १२० दावा करेल, सुनील गावस्कर

रोहित अन् विराटला डच्चू देत भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकाचा संघ, पाहा कोणाला मिळालीय संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---