भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल मागच्या काही वर्षांमध्ये यशाच्या शिखरावर आहे. गिलने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्ससाठी जबरदस्त खेळी केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नसले तरी चाहत्यांना आगामी काळात त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा कायम आहेत. गिलने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये चाहते सारा तेंडुलकर हिचा उल्लेख करत आहेत.
शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकर () याची मुलकी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असतात. शुबमन कुठलीही सोशल मीडिया पोस्ट शेअर केली की, नेटकरी त्याच्यावर सारा तेंडुलकरच्या नावाने कमेंट्स करत असतात. यावेळीही असेच काहीसे झाले. मात्र, एका चाहतीने हद्दच केली. तिने सारा तेंडुलकरचे थेट नावच बदलून टाकले. शालू33प्रिया या इंस्टाग्राम खात्यावरून शुबमन गिलच्या नवीन पोस्टवर ही कमेंट केली गेली आहे. या चाहतीने लिहिले आहे की, “सारा तेंडुलकर नाही…ती भविष्यात सारा गिल असेल.” दरम्यान, गिलच्या पोस्टसोबतच ही कमेंट देखील सर्वांचे लक्षा वेधत आहे.
https://www.instagram.com/p/CtqzeEjqLsW/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MWQ1ZGUxMzBkMA==
तत्पूर्वी अनेकदा सारा तेंडुलकर आमि शुबमन गिल यांच्यातील नात्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. हे दोघे एकमेकांना डेट करतात, असा अनेक बातम्या यापूर्वी आल्या आहेत. पूर्वी ते एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक आणि कमेंट्स देखील करायचे. अशाही बातम्या समोर आल्या होत्या की दोघांनी गोव्यात एकत्र सुट्टीही घालवली होती. दरम्यान, चाहत्यांना आणि नेटकरी सारा तेंडुलकर आणि सारा अली खान यांच्यातही संभ्रम असल्याचे अनेकदा पाहिले गेले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि गिलचे नाव देखील अनेकदा एकत्र जोडले गेले आहे.
गिलच्या प्रदर्शनाविषयी बोलायचे झाले, तर सध्या तो आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, असे म्हणता येईल. कारण नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्यान गुजरात टायटन्सकडून खेळताना सर्वाधिक 890 धावा केल्या होत्या. आयपीएल हंगाम गाजवल्यानंतर गिल जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत देखील भारतासाठी चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर त्याची बॅट शांतच राहिली. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 13, तर दुसऱ्या डावात 18 धावांची खेळी केली होती. परिणामी भारताला हा सामना गमवावा लागाला. ऑस्ट्रेलियन या सामन्यातील विजयानतंर पहिल्यांदा डब्ल्यूसीटी ट्रॉफी जिंकू शकला. (Shubman Gill and Sara Tendular’s relationship is once again being discussed on social media.)
महत्वाच्या बातम्या –
एमपीएलमध्ये केदार जाधवच्या कोल्हापूरचा शानदार विजय, पाहा कुणी केल्या किती धावा?
नेमार, रोनाल्डो अन् मेस्सी! यांंच्यापेक्षाही सुनिल छेत्रीने देशासाठी केलंय जीवाच रान