वनडे विश्वचषक 2023चा 21वा सामना रविवारी (22 ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने खराब सुरुवातीनंतर 273 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी वेगवान अर्धशतकी सुरुवात दिली. गिल याने आपल्या या छोटेखानी खेळी दरम्यान एक मोठा पराक्रम देखील नोंदवला.
या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघाने डेरिल मिचेल याने शतक व रचिन रवींद्र याने अर्धशतकाच्या जोरावर 273 धावा काढल्या. भारतीय संघासाठी मोहम्मद शमी याने पाच बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी आक्रमक धोरण स्विकारले. या जोडीने 11.1 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. रोहितने 46 धावा केल्या. तर, दुसरीकडे गिलने 31 चेंडूंमध्ये पाच चौकाराच्या मदतीने 26 धावा केल्या.
गिलने यादरम्यान आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये आपल्या 2000 धावा केल्या. यासोबतच सर्वात जलद 2000 वनडे धावा बनवणारा तो फलंदाज बनला. यासाठी त्याने केवळ 38 डाव घेतले. त्याने 40 डावात ही कामगिरी करणाऱ्या हाशिम आमला याचा विक्रम मोडला. तर पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास, इंग्लंडचा केविन पीटरसन व पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम यांनी प्रत्येकी 45 डावांमध्ये हा पल्ला गाठला होता.
(Shubman Gill Becomes Fastest 2000 Runs In ODI Surpass Hashim Amala)
महत्वाच्या बातम्या –
पीसीबीचा नवीन करार जाहीर! माजी कर्णधारालाच केले डिमोट, बाबरला…
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान