---Advertisement---

‘वंडर बॉय’ गिलच्या ‘वंडरफुल शतकाने रोहितचा १२ वर्ष जुना विक्रम ध्वस्त

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 4:32 PM
---Advertisement---

झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या व अखेरच्या सामन्यातही शानदार फलंदाजी करत मोठी धावसंख्या फलकावर लावली. युवा फलंदाज शुबमन गिल याने शानदार फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. आपल्या आक्रमक शतकी खेळी दरम्यान त्याने अनेक विक्रमही नोंदवले.

पहिले दोन सामने जिंकून यापूर्वीच मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वतः राहुल व शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, दोघेही जम बसल्यानंतर बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गिलने आयपीएलपासून सुरू असलेला आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत भारताच्या डावाची जबाबदारी घेतली. आधी त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने वेगाने शतकाकडे कूच केली.  ‌

अखेर ८२ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. या शतकासह तो झिम्बाब्वेत शतक झळकावणारा सर्वात युवा भारतीय होण्याचा मान मिळवला. गिलने २२ वर्ष व ३४८ दिवसात शतक ठोकून रोहित शर्माचा २३ वर्ष २८ दिवसांचा विक्रम मोडीत काढला. रोहितने २०१० दौऱ्यावेळी ही कामगिरी केली होती.

भारताबाहेर सर्वात कमी वयात वनडे शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही गिल तिसऱ्या स्थानी आला आहे. या यादीमध्ये युवराज सिंग पहिल्या स्थानी असून, त्याने ऑस्ट्रेलियात २२ वर्ष ४१ दिवस इतके वय असताना शतक पूर्ण केलेले. तर विराट कोहलीने २२ वर्ष ३१५ दिवसांचे वय असताना इंग्लंडमध्ये शतक ठोकलेले. तर, शुबमनच्या शतकाने यापूर्वी तिसऱ्या स्थानी असलेला रोहित चौथ्या स्थानी घसरला आहे.

शुबमनने आपल्या या खेळीत ९७ चेंडूवर १३० धावा चोपल्या. यामध्ये १५ चौकार व एका षटकाराचा समावेश होता. तो भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात बाद झाला.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानी गोलंदाजाचा स्विंग बघून भल्याभल्यांची बॅट थंडावेल! तुम्हीही एकदा पाहाच

हे काय? शिखर धवन गडबडीत घालून आला वेगळीच जर्सी, नाव लपवण्यासाठी वापरली भन्नाट युक्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---