युवा खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. हे खेळाडू अनुभवी खेळाडूंवरही भारी पडत आहेत. या खेळाडूंमध्ये शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश होतो. गिलने आयपीएल 2023च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध वादळी फलंदाजी केली. यावेळी त्याला शतक करण्यास 6 धावा कमी पडल्या. मात्र, शतक हुकल्यानंतर तो खचला नाही, तर संघाचा डाव संपल्यानंतर शुबमन गिलने प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला गिल?
शुबमन गिल (Shubman Gill) म्हणाला की, “शतक करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता, पण ते हुकले. मी उसळी चेंडूवर एक धाव घेतली. मात्र, काही हरकत नाही. अजून 5-6 सामने बाकी आहेत. मला आशा आहे की, त्या सामन्यांमध्ये मी माझे शतक पूर्ण करेल.”
या सामन्यात गिलने गुजरातकडून डावाची सुरुवात केली होती. त्याने या सामन्यात संथ सुरुवात केली होती. त्याने पहिल्या 10 चेंडूत 9 धावाच केल्या होत्या. मात्र, नंतर त्याने 41 चेंडूत 85 धावा चोपल्या. त्याने त्याचे अर्धशतक करताना एकही चौकार मारला नव्हता. त्याने यावेळी 29 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक साकारले होते.
यानंतर त्याने फटकेबाजी कायम ठेवत 7 षटकार आणि फक्त 2 चौकार मारले. याच्या मदतीने गिलने 51 चेंडूत 94 धावांची खेळी साकारली. अशाप्रकारे तो आयपीएलच्या कोणत्याही एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा गुजरातचा पहिला फलंदाज बनला. त्याच्यापूर्वी डेविड मिलर याने मागील वर्षी पुण्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 51 चेंडूत गिलइतकी म्हणजेच 94 धावांची नाबाद खेळी साकारली होती. यामध्ये त्याने 6 षटकारांचा पाऊस पाडला होता. आता या हंगामातील शुबमनची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने आयपीएल 2023मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले.
For his stupendous knock of 94* off 51 deliveries, Shubman Gill is our Top Performer from the first innings.
A look at his batting summary here 👇👇#TATAIPL #GTvLSG pic.twitter.com/DplUofHK9D
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
शुबमन गिलची हंगामातील कामगिरी
आयपीएल 2023मध्ये शुबमन गिल याने आतापर्यंत 11 सामने खेळताना 142च्या स्ट्राईक रेटने 447 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 4 अर्धशतके ठोकली आहेत. त्यात 12 षटकार आणि 48 चौकारांचा समावेश आहे.
गुजरातचा डाव
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना गिल (94*) आणि वृद्धिमान साहा (81) यांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 2 विकेट्स गमावत 227 धावांचा मोठा डोंगर उभारला. ही या आयपीएलमधील गुजरातची सर्वात मोठी धावसंख्या आहे. गुजरातकडून पहिल्या विकेटसाठी गिल आणि साहा यांच्यात 12.1 षटकात 142 धावांची भागीदारी झाली. ही आयपीएल 2023मधील पहिल्या विकेटसाठीची दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे.
Innings Break!@gujarat_titans post a massive total of 227/2 on the board.#LSG chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/DEuRiNeIOF #TATAIPL #GTvLSG #IPL2023 pic.twitter.com/gZtj713tph
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
या सामन्यात गुजरातविरुद्ध गोलंदाजी करताना लखनऊच्या मोहसिन खान आणि आवेश खान यांनाच प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले. (shubman gill big statement after missed to hit century vs lsg in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘देशासाठी फक्त 11 जणच खेळू शकतात…’, आयपीएलदरम्यान रवी शास्त्रींचे मोठे विधान
‘हा खूपच भावूक दिवस, आमच्या बाबांना…’, नाणेफेकीवेळी भाऊ कृणालसमोर हार्दिक इमोशनल