बांगलादेश आणि भारत (BANvIND) यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या आणि यजमानांचा 150 धावसंख्येवरच सर्वबाद केले. त्यामुळे भारताकडे 254 धावांची भक्कम आघाडी राहिली. भारताने बांगलादेशला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी सुरू केली. ज्यामध्ये कर्णधार केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरूवात केली. गिल तर अर्धशतकी खेळी करत खेळपट्टीवर टिकून आहे.
शुबमन गिल (Shubman Gill) 120 चेंडूत 80 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहे. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार मारले आहे. त्याचबरोबर त्याने पहिल्या विकेटसाठी केएल राहुल याच्यासोबत 70 धावांची भागीदारीही रचली. तोच फॉर्म त्याने कायम राखला असून चेतेश्वर पुजारा याच्यासोबतही दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली आहे. पुजाराही 55 चेंडूत 33 धावा करत नाबाद आहे.
https://twitter.com/ICC/status/1603648300908830720?s=20&t=6D5LTNjXa2nKWtEmNNHi-g
राहुल चांगला खेळत होता, मात्र तो 23व्या षटकात खालीद अहमद याचा शिकार ठरला. त्याने 62 चेंडूत 23 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 चौकार मारले. भारताच्या फलंदाजांनी मेहदी हसन मिराज याला चांगलेच धुतले आहे. हसनने भारताच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत 6 षटकात 32 धावा दिल्या आहेत.
या सामन्यात भारताचा वेगाने अधिक धावा करण्याचा प्रयत्न आहे, जो पूर्ण होताना दिसत आहे. कारण भारताला हा सामना जिंकणे अत्यावश्यत आहे. ज्यामुळे भारताच्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2022-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1603658963551420416?s=20&t=6D5LTNjXa2nKWtEmNNHi-g
तत्पूर्वी या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या पहिल्या डावात प्रभावी कामगिरी केली. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या दोघांनी मिळून तब्बल 8 विकेट्स घेतल्या. यावेळी कुलदीपने त्याच्या कसोटी कारकिर्दीत गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने 16 षटकात 40 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर तो चट्टोग्राममध्ये 5 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. तसेच तो बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये एका डावात 5 विकेट्स घेणारा सातवा भारतीय ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पाकिस्तानच्या स्टार फलंदाजाने केली कसोटीतून निवृत्ती जाहीर, शेवटचा सामना खेळणार इंग्लंडविरुद्ध
कुलदीपने कुंबळे आणि अश्विन यांना मागे पाडले खरे, पण ‘या’ भारतीय गोलंदाजाचा विक्रम अजूनही अबाधित






