भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा वनडे कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) पत्रकार परिषदेत हजेरी लावली. यावेळी त्याने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांनी आणि वनडे वर्ल्ड कपबाबत केलेल्या विधानामुळे तो सध्या चर्चेत आहे.
नुकतेच शुबमन गिलला (Shubman gill) टी-20 संघातून डच्चू देण्यात आला होता. याबद्दल विचारले असता त्याने कोणत्याही आढेवेढे न घेता मोकळेपणाने उत्तर दिले. तो म्हणाला, निवड समितीच्या निर्णयाचा मी आदर करतो. टी20 वर्ल्ड कपसाठी संघाला मनापासून शुभेच्छा.
न्यूझीलंडविरुद्ध गिलची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. त्याबद्दलही त्याने मोठे विधान केले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या शेवटच्या वर्ल्ड कप विजयाची आठवण गिलने यावेळी काढली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सध्याच्या कसोटी संघाच्या कामगिरीचा गिलने खंबीरपणे बचाव केला. आगामी वनडे वर्ल्ड कपबद्दल गिलने पहिल्यांदाच मोठे विधान केले असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.






