Shubman Gill Record: भारतीय संघ आत्मविश्वासाने द ओव्हल मैदानावर उतरेल, कारण इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीनंतरही भारतीय संघ मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला होता. या मालिकेत शुबमन गिलने कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व केले आहेच, शिवाय फलंदाजीतही 8 डावांमध्ये 722 धावा करत तो मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत तो रेकाॅर्डची रांग लावू शकतो. तो थेट डॉन ब्रॅडमनचा 95 वर्षांचा जुना रेकाॅर्डही मोडून काढू शकतो. (Shubman Gill can break Don Bradman’s big record)
शुबमन गिलने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत 722 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड सुनील गावस्करच्या नावावर आहे, ज्याने 1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 732 धावा केल्या होत्या. आता गिल 11 धावा करताच गावस्करचा रेकाॅर्ड मोडेल.
कोणत्याही एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे, ज्याने 1930 मध्ये इंग्लंडविरुद्ध 974 धावा केल्या होत्या. (Don Bradman Test Record) गिलने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 722 धावा केल्या आहेत. जर त्याने पाचव्या कसोटीत आणखी 253 धावा केल्या, तर गिल कोणत्याही एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.
कोणत्याही एका भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड इंग्लंडच्या ग्रॅहम गूचच्या नावावर आहे, ज्याने 1990 मध्ये मालिकेत 752 धावा केल्या होत्या. जर पाचव्या कसोटीत शुबमन गिलने आणखी 31 धावा केल्या, तर तो ग्रॅहम गूचला मागे टाकेल. (Graham Gooch vs India)
भारतासाठी कोणत्याही एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्डही सुनील गावस्करच्या नावावर आहे. त्याने 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 1,025 धावा केल्या होत्या. हा रेकाॅर्ड मोडण्यासाठी शुबमन गिलला फक्त 53 धावांची आवश्यकता आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील 4 सामन्यांमध्ये शुबमन गिलने कर्णधार म्हणून 4 शतके झळकावली आहेत. या बाबतीत तो सध्या डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांच्यासोबत बरोबरीत आहे, ज्यांनी एकाच कसोटी मालिकेत 4 शतके झळकावली आहेत. म्हणजेच, पाचव्या कसोटीत एक शतक करताच गिल एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम करेल. (World Record for Most Centuries in a Test Series)





