---Advertisement---

शुबमन गिलने जिंकले दिल! तिरुअनंतपुरम वनडेत झळकावले कारकिर्दीतील दुसरे शतक

On: रविवार, जानेवारी 15, 2023 3:47 PM
gill-century-zim.
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तिरुअनंतपुरम येथे वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या मालिकेत सलामीची जबाबदारी मिळालेल्या युवा शुबमन गिल याने या मोक्याचा फायदा उठवत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले.

 

तिरुवनंतपुरम येथील या सामन्यात गिल सलग तिसऱ्यांदा रोहितसह सलामीला उतरला. गिलने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात चांगला खेळ दाखवला होता. पहिल्या सामन्यात त्याने 60 धावांची खेळी केलेली. तर, या सामन्यातही त्याने चांगल्या पद्धतीने 21 धावा केल्या होत्या.

सामन्यात पुन्हा एकदा या जोडीने संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी अवघ्या 15.2 षटकात 92 धावांची सलामी दिली.‌ रोहित वैयक्तिक 42 धावांवर बाद झाल्यावर गिलने विराटसह भारताचा डाव पुढे नेला.‌ दोघांनी देखील आक्रमक खेळ दाखवत श्रीलंकेला दबावात टाकले. यादरम्यान गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने विराटने आपला शानदार खेळ दाखवला.

भारतीय संघ 200 धावांच्या पार गेल्यानंतर गिलने 88 चेंडूंवर आपले दुसरे वनडे शतक पूर्ण केले. यामध्ये 12 चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. शतकानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. 97 चेंडूत 116 धावा करत त्याने तंबूचा रस्ता पकडला. त्याला कसून रजिथाने बाद केले.

(Shubman Gill Hits 2nd odi century in 3rd odi)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---