---Advertisement---

टीम इंडियाचा प्रिन्स चमकला! डाव सावरत शुबमनने झळकावले शानदार शतक

On: शुक्रवार, सप्टेंबर 15, 2023 10:39 PM
shubman gill century
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारत आणि बांगलादेश हे संघ आमने-सामने आले आहेत. भारतीय संघासमोर बांगलादेशासाठी 266 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर शुबमन गिल याने शानदार शतक ठोकत भारतीय संघाला सामन्यात जिवंत ठेवले. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील पाचवे शतक ठरले.

यापूर्वी अंतिम सामन्यात जागा बनवलेल्या भारतीय संघासमोर बांगलादेश संघाने 266 धावांचे लक्ष ठेवले. कर्णधार रोहित खातेही न खोलता बाद झाल्यानंतर तिलक वर्मा, केएल राहुल,‌ ईशान किशन व सूर्यकुमार यादव हे नियमित अंतराने बाद झाले तरी, गिल याने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने 117 चेंडूंमध्ये आपल्या वनडे कारकीर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. तो भारतीय संघासाठी सामना संपवेल अशी अपेक्षा असताना बाद झाला.

बाद होण्यापूर्वी त्याने 133 चेंडूवर 8 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 121 धावा केल्या. त्याने आत्तापर्यंत आपल्या वनडे कारकीर्दीत 32 डाव खेळताना पाच शतके व आठ अर्धशतके पूर्ण केली आहेत.

(Shubman Gill Hits Century Against Bangaladesh In Asia Cup)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---