भारताचा भविष्यातील दिग्गज सलामीवीर म्हणून शुबमन गिल स्वतःला सिद्ध करत आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सध्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभी केल्यानंतर भारतीय संघ प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात आहे. शनिवारी (11 मार्च) भारतीय सलामीवीर शुबमन गिल याने स्वतःचे शतक पूर्ण केले आणि खाही खास विक्रम देखील नावावर केले.
शुबमन गिल (Shubman Gill) याने 2023 सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 5 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा एकही फलंदाज मागच्या तीन महिन्यांमध्ये शतकांच्या बाबतीत गिलची बरोबरी करू शकला नाहीये. एवढेच नाही तर गिलने एकट्याने यावर्षी 5 शतके ठोकली आहेत, तर दुसरीकडे भारताच्या इतर सर्व फलंदाजांनी मिळून यावर्षी एकूण 5 शतके केली आहेत. या आकडेवारीवरून असेच दिसते की, गिल सध्या भारतीय संघातीलच नाही, तर जगातील सर्वात चांगल्या फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आहे.
यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्यांचा विचार केला, तर शुबमन गिल 5 शतकांसह सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर तीन शतकांसह न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे (Devon Conway) आहे. विराट कोहली (Virat Kohli) याने यावर्षी 2 शतके केली असून तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकाव भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असून, त्याने दोन शतके केली आहेत. पाचव्या क्रमांकावर उस्मान ख्वाजा, त्यानंतर टेंबा बाऊमा, जेसन रॉय आणि डेविड मलान यांची नावे आहेत. शेवटच्या तिघांनी देखील 2023 सुरू झाल्यापासून प्रत्येकी दोन-दोन विकेट्स गमावल्या आहेत.
2023 मध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
5 – शुमबन गिल*
3 – डेवॉन कॉनवे
2 – विराट कोहली
2 – रोहित शर्मा
2 – उस्मान ख्वाजा
2 – टेंबा बाऊमा
2 – जेसन रॉय
2 – डेविड मलान
यावर्षी भारतीय संघासाठी केलेली शतके
5 – शुबमन गिल*
5 – संघातील इतर खेळाडू
दरम्यान, उभय संघांतील या अहमदाबाद कसोटीचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा याने 180, तर कॅमरून ग्रीन याने 114 धावा कुटल्यामुळे पहिल्या डावात पाहुण्या संघाला ही मोठी धावसंख्या साकारता आली. प्रत्युत्तरता भारतासाठी सलामीवीर शुबमन गिल याने 194 चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले. गिलच्या शतकामध्ये 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. रोहित शर्मा 35, तर चेतेश्वर पुजारा 42 धावा करून पहिल्या डावात बाद झाले. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे, तर भारतातील पहिले कसोटी शतक ठरले.
(Shubman Gill hits his fifth century of 2023 in Ahmedabad Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करायचा नाय! 37व्या वयातही उथप्पाने दाखवली चित्त्यासारखी चपळाई, निसटता झेल डाईव्ह मारून पकडला
पंत नाहीये म्हणून काय झालं, दिल्लीला मिळाला नवीन पॉवर हिटर; बाबरच्या संघाविरुद्ध ठोकलं वेगवान शतक