भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय कर्णधार हार्दिक पंड्या याने घेतला होता. सलामीवीर शुबमन गिल याने वनडे क्रिकेटमधील आपला फॉर्म कायम राखत टी20 क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. तसेच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पाचवा फलंदाज बनला.
𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐘 𝐟𝐨𝐫 𝐒𝐇𝐔𝐁𝐌𝐀𝐍 𝐆𝐈𝐋𝐋 👏👏
A brilliant innings from #TeamIndia opener as he brings up a fine 💯 off 54 deliveries.#INDvNZ pic.twitter.com/4NjIfKg7e1
— BCCI (@BCCI) February 1, 2023
पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करण्यात त्याला अपयश आलेले. मात्र, या सामन्यातील पहिल्या षटकापासून त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. ईशान किशन लवकर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी याने मोर्चा सांभाळत वेगवान 44 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने गिलने 35 चेंडूंवर सात चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर त्याने आपल्या खेळाची गती वाढवली. त्याने अर्धशतक ते शतक हा टप्पा केवळ 19 चेंडूंमध्ये पूर्ण केला. त्याने 54 चेंडूंवर 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. शतकानंतरही त्याने आपले आक्रमण सुरूच ठेवले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 63 चेंडूवर 126 धावा कुटल्या. यामध्ये 12 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता.
भारतीय डावाचा विचार केल्यास गिल व्यतिरिक्त राहुल त्रिपाठीने 22 चेंडूवर 44 धावा काढल्या. तर, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनी अनुक्रमे 24 व 30 धावा जमवल्या. या सर्वांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने 4 बाद 234 धावा उभारल्या.
(Shubman Gill Hits Maiden T20I Century In Ahmedabad)