काही वर्षांपूर्वींचीच गोष्ट आहे, जेव्हा क्रिकेटपटू फिटनेसकडे जास्त लक्ष द्यायचे नाहीत. मात्र आता बदलत्या काळात खेळाची शैलीही बदलली आहे. आता भारतीय खेळाडू जिममध्ये सतत घाम गाळताना दिसतात. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंचे सिक्स पॅक ॲब्स बनले आहेत. असाच एक क्रिकेटपटू म्हणजे टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल.
शुबमन गिलची गणना भारतीय क्रिकेट संघातील सर्वात डॅशिंग क्रिकेटपटूंमध्ये होते. गिल त्याचा लूक आणि अप्रतिम शरीरयष्टीमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. स्त्री चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या युवा फलंदाजानं नुकतेच आपले काही फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोंमध्ये गिल आपले सिक्स पॅक ऍब्स दाखवताना दिसतोय.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅटनं खळबळ माजवल्यानंतर शुबमन गिल सध्या सुट्टीवर आहे. नुकतेच गिलनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले, ज्यामध्ये तो त्याचे ॲब्स दाखवतोय. फोटोंमध्ये गिलनं स्वत:ला टॉवेलमध्ये गुंडाळलं असून त्यानं डोक्यावर टोपी घातली आहे. गिलचं अप्रतिम शरीर या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतं. चाहते यावर विविध कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
24 वर्षीय शुबमन गिलसाठी इंग्लंडविरुद्ध खेळलेली कसोटी मालिका संस्मरणीय ठरली. गिलनं पाच सामन्यांच्या एकूण 9 डावात 56.50 च्या दमदार सरासरीनं 452 धावा ठोकल्या. मालिकेत तो यशस्वी जयस्वाल नंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या दरम्यान त्यानं तीन शतकंही झळकावली. धरमशाला येथे झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात गिलनं 110 धावांची शानदार खेळी केली होती.
येत्या 22 मार्चपासून सुरू होत अललेल्या आयपीएल 2024 मध्ये शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना दिसेल. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाल्यानंतर गुजरातनं इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामासाठी संघाची धुरा गिलकडे सोपवली. गुजरातकडून खेळताना गेल्या दोन मोसमात या सलामीच्या फलंदाजाची कामगिरी दमदार राहिली आहे. आयपीएलनंतर टी 20 विश्वचषक खेळला जाणार आहे. अशा स्थितीत या मोसमातही गिल बॅटनं स्फोटक कामगिरी करायचे प्रयत्न नक्कीच करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: शुभमन नव्हे, हा तर ‘सुपरमॅन’! चित्त्यासारखं मागे धावत जाऊन घेतला बेन डकेटचा शानदार झेल
शुबमन गिलचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ठोकलं शानदार शतक
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!