शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2025 स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत आहे. पण आता संघ अडचणीत सापडताना दिसत आहे. त्याचं कारण आहे की, कर्णधार पूर्णपणे फिट नाही. त्याच्या पाठीमध्ये वेदना होत आहेत. त्यामुळेच राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात त्याला बाहेर बसावे लागले होते. त्याच्या वेदनेवर आता संघाचे डायरेक्टर विक्रम सोळंकी यांनी अपडेट दिली आहे, जाणून घ्या ते काय म्हणाले?
प्री-मॅच प्रेस कॉन्फरन्सशी बोलताना सोळंकी म्हणाले, संघ गिल सोबत खूप सावधानपणे राहण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ते म्हणाले, संघाला पूर्ण विश्वास आहे की, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यासाठी तो फिट होईल. त्याच्या पाठीमध्ये वेदना होत आहेत, त्यामुळेच आम्ही थोडी सावधानी बाळगत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, तो लवकरच ठीक होईल.
गुजरात संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 12 गुणांनी चौथ्या स्थानावर आहे. संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 5 मधील 2 सामने जिंकावे लागतील. शुबमन गिलबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत सलग चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्याने 9 सामन्यांमध्ये 389 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 अर्धशतके सामील आहेत. तसेच या हंगामात त्याची सरासरी 48.62 राहिली आहे.
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुबमन गिल (कर्णधार), जॉस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज






