सध्या टेलिव्हिजन (टीव्ही) अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि क्रिकेटर शुबमन गिल यांच्या लग्नाची चर्चा आहे. रिद्धिमा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या शुबमनसोबत लग्न करणार असल्याची बातमी नुकतीच सोशल मीडियावर आली होती. डिसेंबरमध्ये हे लग्न होणार असल्याचंही बोललं जात होतं. आता या बातमीत किती तथ्य आहे, हे स्पष्ट झालं आहे.
रिद्धिमा पंडित हिनं हे वृत्त फेटाळून लावलंय. यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं ती म्हणाली. म्हणजेच ती शुबमनशी लग्न करत नाहीये. अलीकडेच, एक अहवाल ऑनलाइन व्हायरल झाला होता, ज्यात दावा केला होता की ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडित डिसेंबर 2024 मध्ये शुबमन गिलशी लग्न करणार आहे.
‘टेली चक्कर’च्या वृत्तानुसार, रिद्धिमा पंडितनं नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, “माझ्या लग्नाबद्दल पत्रकारांच्या कॉल्समुळे मला जाग आली. पण कोणतं लग्न? माझं लग्न होत नाहीये. माझ्या आयुष्यात असं काही विशेष घडलं तर मी स्वतः त्याची घोषणा करीन.”
रिद्धिमा पंडित हिला ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेमुळे ती रातोरात स्टार झाली. मालिकेत तिनं रोबोटची भूमिका साकारली होती. याशिवाय रिद्धिमा ‘खतरा खतरा’ सारख्या टीव्ही शोसाठी देखील ओळखली जाते. ती ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनमध्येही दिसली होती.
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुबमन गिलचं नाव यापूर्वी अनेक सेलिब्रेटींशी जोडलं गेलं आहे. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्या सोबत त्याच्या अफेरचच्या चर्चा नेहमीच रंगतात. मात्र याला या दोघांकडूनही अद्याप पुष्टी मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वांचा लाडका ‘डीके’ झाला 39 वर्षांचा! धोनीच्या सावलीत झाकोळली गेली अख्खी क्रिकेट कारकीर्द
मोठी बातमी! टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघात खळबळ! स्टार क्रिकेटपटू सट्टेबाजीमुळे निलंबित