---Advertisement---

शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही? प्रशिक्षक राहुल द्रविडने स्वतः दिली माहिती

On: शुक्रवार, ऑक्टोबर 6, 2023 7:55 PM
Shubman Gill Ruturaj Gaikwad
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याच्या आजारपणाची माहिती शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सकाळी समोर आली. माध्यमांतील वृत्तांनुसार गिल याला डेंग्यू झाला असून तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. पण अद्याप याविषयी कुठलीच अधिकृत माहिती समोर आली नाहीये. शुक्रवारी सायंकाळी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गिलच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती माध्यमांना दिली.

वनडे विश्वचषकाचे यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. यजमानांना आपला पहिला विश्वचषक सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) खेळणार की नाही, याविषयी चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी त्याच्या फिटनेसबाबत महत्वाची माहिती दिली. द्रविडने यावेळी गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही, असे स्पष्टपणे म्हटले नाही.

द्रविड म्हणाला, “आता त्याला आधीपेक्षा बरे वाटत आहे. मेडिकल टीम रोज त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. ते काय निर्णय घेतात, हे पाहावा लेगाले. गिलच्या हातात पुढचे 36 तास असतील. परवा दिवशी त्याला कसे वाटते, हे पाहावे लागेल.” दरम्यान, गिल चालू वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. आगामी वनडे विश्वचषकात देखील त्याची भूमिका महत्वाची राहणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध गिलने माघार घेतली, तर त्याच्या जागी ईशान किशन सलामीवीर म्हणून खेळताना दिसू शकतो. (Shubman Gill not to play against Australia? Coach Rahul Dravid himself gave the information)

वनडे विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.

महत्वाच्या बातम्या – 
20 वर्षांपूर्वी बापाने केलेली कामगिरी बास डी लीडेने पुन्हा प्रत्यक्षात उतरवली, मिळवले दिग्गजांच्या यादीत स्थान
रिझवान-शकीलच्या बळावर पाकिस्तानची मोठी धावसंख्या, नेदरलँड्ससमोर विजयासाठी 287 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---