युवा सलामीवीर शुबमन गिल आयपीएलच्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली या संघाने आत्तापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यापैकी एकाही पराभव स्विकारलेला नाही. हार्दिक पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे तो कर्णधार म्हणून कसा आहे, याबद्दल अनेकांना प्रश्न पडला आहे. पण, शुबमन गिलने हार्दिकबद्दल कर्णधार म्हणून अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी शुबमन गिल म्हणाला, “ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगले आहे. हार्दिक पंड्या आणि आशिष नेहराने सुनिश्चित केले की मूड नेहमी व्यवस्थित रहावा. केवळ एका सामन्यात नव्हे, तर सर्व सामन्यांत हाच प्रयत्न राहिल. आत्तापर्यंत सर्व चांगले आहे. या हंगामात काही वेगळे (फलंदाजीत) केले नाही. फक्त ती साधी ठेवण्याचा प्रयत्न केला.”
गिल हार्दिकच्या कर्णधारपदाबाबत म्हणाला, “हार्दिक सर्वांना व्यक्त होण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य देतो, तो मोकळेपणाने खेळण्याचे स्वतंत्र्य देतो. त्यामुळे एक खेळाडू म्हणून तुम्हाला खुप आत्मविश्वास मिळतो.”
देशांतर्गत क्रिकेट पंजाबकडून खेळणाऱ्या गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मागील सामन्यात ८४ धावांची शानदार खेळी खेळली आहे. तसेच त्याने पंजाबविरुद्ध ९६ धावांची खेळी खेळली आहे, यादरम्यान त्याने ५९ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार लगावले आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १३ सामने खेळले आहेत. त्याने कसोटीमध्ये ४ अर्धशतक लगावले आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत ६१ सामन्यांत १५९७ धावा केल्या आहेत. मात्र, त्याला अद्याप टी२० मध्ये भारतीय संघात खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही.
हार्दिकच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली गुजरात संघाने आयपीएलची (IPL 2022) शानदार सुरुवात केली आणि आपल्या पहिल्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे. संघाने आपल्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत केले, तर दूसऱ्या सामन्यात संघाने दिल्ली कॅपिटल्सला १४ धावांनी पराभूत केले. तसेच तिसऱ्या सामन्यात गुजरातने पंजाबला ६ विकेट्सने पराभूत केले. या संघाचे प्रशिक्षक माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आहेत
महत्त्वाच्या बातम्या-
GT vs PBKS| शेवटच्या दोन चेंडूवर षटकार लगावताच तेवातियाचा धोनी-जडेजाच्या खास क्लबमध्ये समावेश
IPL 2022| हैदराबाद की चेन्नई कोण मिळवणार पहिला विजय? सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही