भारतीय पुरूष क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला सामना भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळत असून संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसरा कसोटी सामना खेळण्याची दाट शक्यता आहे. तो त्याच्या हाताच्या दुखापतीतून सावरत असून संघात पुनरागमन करू शकतो. यामुळे सध्याचा सलामीवीर शुबमन गिल याची जागा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर गिल की राहुल दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही हा पण प्रश्न निर्माण झाला आहे.
भारताच्या संघव्यवस्थापकांकडे दुसऱ्या कसोटीत अंतिम अकरा खेळाडू निश्चित करण्यासाठी अजून वेळ आहे. असे असले तरीही भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त करताना शुबमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या सामन्यासाठी बाकावर बसेल, असे म्हटले आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना मांजरेकर म्हणाले, “संघव्यवस्थापक राहुलला बाहेर नाही करू शकत. यामुळे शतक करणारा गिल बाहेर जाईल.”
मांजरेकर यांनी पुढे म्हटले, “गिल उत्तम खेळत असून त्याने शतक ठोकले आहे. जर रोहित संघात परतला राहुल-रोहित हीच जोडी सलामीसाठी उत्तम असे तुमचे मत असेल. रोहित हा कर्णधार असून त्याला तुम्ही बाहेर काढू शकत नाही. दुसरीकडे राहुल धावा करण्यात अपयशी होत असला तरी तो संघात राहणार. यामुळे गिलला बाहेर व्हावे लागेल. असेच अजिंक्य रहाणेसोबतही झाले होते.”
रोहितच्या पुनरागमनाने संघव्यवस्थापकांची डोकेदुखी वाढणार हे निश्चितच आहे, कारण चेतेश्वर पुजाराने आपले स्थान कायम राखले आहे. त्याने तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करताना बांगलादेशविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात 90 आणि दुसऱ्या डावात नाबाद शतकी खेळी केली. त्याचे हे शतक तब्बल 1400 पेक्षा अधिक दिवसांनी आले असून ते त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जलद कसोटी शतक ठरले.
तसेच संघातील चौथा आणि पाचवा फलंदाजी क्रमांक व्यस्त आहे. विराट कोहली तिसऱ्या तर रिषभ पंत पाचव्या स्थानावर फलंदाजी करणार असल्याने गिलला बाहेरच बसावे लागणार की काय? त्याने बांगलादेशविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक केले. Shubman Gill out of the second test vs BAN & Rohit Sharma Could replaced said Sanjay Manjrekar
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यजमानांचा पलटवार, डाव घोषित करण्याच्या घाईने भारत धोक्यात! शांतो-हसनची विक्रमी भागीदारी
पहिल्या कसोटी शतकाला शुबमन गिलने म्हटले खास, मात्र एका गोष्टीमुळे ‘नाराज’