भारताचा प्रतिभावान फलंदाज शुबमन गिलने सांगितले की, माजी अनुभवी अष्टपैलू युवराज सिंगचा सल्ला त्याच्यासाठी खूप उपयुक्त होता. गिलने हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ZIM vs IND 3rd ODI) कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. पंजाबच्या शुबमन गिलने ९७ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १३० धावा ठोकल्या आणि भारताने झिम्बाब्वेचा १३ धावांनी पराभव करत मालिका ३-० ने क्लीन स्वीप केली. त्याच्या खेळीचे युवराजसह अनेक माजी खेळाडूंनी कौतुक केले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये गिल म्हणाला की, “झिम्बाब्वेला येण्यापूर्वी मी त्याला (युवराज) भेटलो आणि त्याने मला सांगितले की तू चांगली फलंदाजी करत आहेस. तिथे जा आणि जर तु क्रीजवर अडकलास तर पूर्ण षटके खेळण्याचा प्रयत्न कर. मी त्याला सांगितले की शतक येत नाही आणि तो म्हणाला काळजी करू नको.”
From a maiden international 💯 & @YUVSTRONG12's special message to #TeamIndia's #ZIMvIND ODI series win. 👌👌
Man of the moment @ShubmanGill chats with @ishankishan51. 👏 👏 – By @ameyatilak
P.S. @SDhawan25's special appearance 😎
Full interview 🎥🔽https://t.co/qTzrBaEA6q pic.twitter.com/GWYZEU5HeF
— BCCI (@BCCI) August 23, 2022
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील मालिकेत नाबाद ९८ धावांची खेळी केल्यानंतर पावसामुळे शतक हुकलेला गिल परदेशी भूमीवर शतक झळकावणारा युवराज आणि विराट कोहलीनंतरचा तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज आहे. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झालेल्या गिलने इशान किशनशी संवाद साधताना सांगितले की, “फलंदाजी करण्यासाठी ही विकेट चांगली होती. मला तुमची साथ मिळाली आणि नशीब माझ्या बाजूने होते. या संधीचा पुरेपूर फायदा करून घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते आणि मी ते केले याचा मला आनंद आहे.”
झिम्बाब्वेचा फलंदाज सिकंदर रझा यानेही ९५ चेंडूत ११५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला पण त्यानंतर गिलने लाँग ऑनवर त्याचा अप्रतिम झेल घेत भारताला १३ धावांनी विजय मिळवून दिला. यावल बोलताना गिल म्हणाला की, “सामना खूप खडतर होता. सामना इतका जवळ येईल असे आम्हाला वाटले नव्हते पण क्रिकेट हेच आहे. जेव्हा चेंडू हवेत होता तेव्हा प्रथम मला वाटत होते की चेंडू माझ्याकडे सहज येईल पण चेंडू खाली पडत होता आणि मी तो पकडण्यासाठी डाईव्ह मारली.”
दरम्यान, भारताने या मालिकेत झिम्बाब्वेला क्लिन स्वीप देऊन आयसीसी वनडे संघ क्रमवारीत आपले अंक वाढवले आहेत. आता यानंतर सगळ्यांच्या नजरा आगामी आशिया चषकावर खिळल्या आहेत. ज्यामध्ये २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये एक रोमहर्षक लढत होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia CUP: ‘भारत-पाकिस्तान सामन्याची वेळ, ठिकाण अन् थेट प्रक्षेपण!’ जाणून घ्या सगळं काही एका क्लिकवर
आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास
‘लोकांची तोंडे तेव्हा बंद होतील, जेव्हा विराट…’, रवी शास्त्रींचे कोहलीबाबत खळबळजनक वक्तव्य