बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ईशान किशन याने द्विशतक झळकावत क्रिकेट विश्वात सर्वाना हैराण केले. बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 210 धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्याने या डावात विस्फोटक फलंदाजी करत सलामीवीराच्या रुपात स्वत:ला सिद्ध केले. आता त्याचे सलामीवाराच्या भुमिकेत खेळणे जवळपास पक्के आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर यानेे ईशान किशन याच्या विस्फोटक खेळीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) याने ईशान किशन याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते, ईशानच्या धमाकेदार प्रदर्शनामुळे शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहेे. गिलने हल्लीच्या काळात चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहेे. मात्र, ईशान किशन (Ishan Kishan) असताना त्याला प्लेेईंग इलेवनमध्ये जागा मिळवणे अवघड आहेे. माध्यमांशी बोलताना जाफर म्हणाला की, “ईशानने निश्चितपणे एकदिवसीय संघात आपली जागा बनवली आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आता रोहित आणि ईशानच्या जो़डीला महत्व देईल. जर शुबमन गिल (Shubman Gill) याला प्लेईंग इलेवनमध्ये स्थान दिले गेले, तर त्याला कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवण्यात येईल हे सांगणे सध्या कठीण आहे. ”
पुढे जाफर म्हणाला की, “ईशान किशन स्पष्टपणे शुबमनच्या पुढे आहे, मला गिलसाठी खूप वाईट वाटत आहे कारण, तो या खेळीच्या आधी तो नक्कीच किशनच्या पुढे होता. तो रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यानंतर सलामीवीरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. आता तो चौथ्या क्रमांकावर ढकलला गेला आहे.”
भारत आणि बांगलादेश या संघात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशन याने विस्फोटक खेळी केली होती. त्याने 131 चेंडूत 210 धावांची खेळी केलेली, ज्यात 24 चौकार तर 10 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात विराट कोहली याने देखील आपले 72वे शतक पूर्ण केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोस बटलर बनला आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘या’ खेळाडूंने मारली बाजी
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात बदल, ‘या’ निर्णयामुळे चाहते नाराज