भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर हा सामना रंगलाय. सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताकडून युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यानं कसोटी पदार्पण केलं.
सामन्याच्या सुरुवातील इंग्लंडच्या ओपनर्सनं स्टोक्सचा निर्णय अगदी योग्य ठरवला. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागिदारी केली. मात्र हे दोघे धोकादायक बनत असतानाच शुभमन गिल यानं बेन डकेटची शानदार कॅच पकडत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि ही जोडी फोडली. (Shubman Gill catch).
18व्या षटकात डकेटनं कुलदीप यादवचा शेवटचा चेंडू उंच टोलावला. चेंडू इन-फिल्ड क्लिअर करून जाईल असं वाटत होतं, मात्र मध्ये आडवा आला तो शुभमन गिल! गिल उलटा मागे धावत गेला आणि त्यानं सुपरमॅन सारखी डाईव्ह मारून झेल घेतला. गिलनं झेल घेताच भारतीय संघातील खेळाडूंनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराहनं तर येऊन गिलला मिठीच मारली. बेन डकेट 58 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीनं 27 धावा करून बाद झाला. बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून या कॅचचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Catching game 🔛 point! ⚡️ ⚡️
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @ShubmanGill | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DdHGPrTMVL
— BCCI (@BCCI) March 7, 2024
भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड – जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! क्रिकेटच्या देवाची विकेट Bigg Boss विजेत्या मुनवर फारुकीनं घेतली! पाहा Video
फोटो ऑफ द डे! 100व्या कसोटीसाठी अश्विनसोबत फॅमिलीही मैदानात, द्रविडकडून मिळाली खास कॅप
Video: श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये पुन्हा राडा! बॅटला चेंडू लागूनही तिसऱ्या अंपायरनं दिलं नॉट आऊट