कालच आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने ज्या शुभमन गिलला तब्बल १ कोटी ८० कोटी रुपये मोजून संघात घेतले त्याने आज पाकिस्तान विरुद्ध १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात नाबाद १०२ धावांची खेळी केली. त्याने ही खेळी करताना ९४ चेंडूत ७ चौकर मारले.
ह्या शतकी खेळीत त्याने अनेक विक्रमही केले. त्यातील सर्वात खास विक्रम म्हणजे १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्यात शतक करणाराही तो पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सलमान बटने २००२मध्ये नाबाद ८५ धावा केल्या होत्या.
तसेच युवकांच्या क्रिकेटमध्ये सलग ६ अर्धशतके किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
१९ वर्षांखालील विश्वचषकात सलग ४ सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी मेहिडी हसन मिराजने अशी कामगिरी केली होती.
आज शुभम गिलने शतक करताना ९३ चेंडू घेतले. हे भारताकडून १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकातील तिसरे वेगवान शतक आहे. यापूर्वी विराट कोहलीने २००८मध्ये ७३चेंडूत तर २०१६मध्ये रिषभ पंतने ८२ चेंडूत शतकी खेळी केली होती.