---Advertisement---

वनडे वर्ल्ड कप 2027 साठी शुबमन गिल आणि विराट कोहलीचा मास्टरप्लान! कॅप्टन गिलचा मोठा खुलासा

On: सोमवार, जुलै 13, 2026 8:14 PM
---Advertisement---

टीम इंडिया (Team india) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे 14 जुलैपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. विराट कोहली (Virat Kohli and Captain Shubman gill) आणि कर्णधार शुबमन गिल यांनी एकत्र नेट्समध्ये फलंदाजी केली.

यावेळी या दोन्ही खेळाडूंनी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठीच्या नियोजनावर चर्चा केली. गिलने पत्रकार परिषदेत या चर्चेचा खुलासा केला. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलने पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही संघ निवडीच्या (टीम कॉम्बिनेशन) विषयावर चर्चा करत होतो. दक्षिण आफ्रिकेत (वर्ल्ड कप दरम्यान) आपल्यासाठी कोणते संयोजन सर्वोत्तम ठरेल आणि असे कोणते खेळाडू आहेत जे सध्या संघात नाहीत पण भविष्यात आपल्याला मदत करू शकतात, यावर आमचे बोलणे झाले.

याव्यतिरिक्त, रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल बोलताना गिल म्हणाला, रोहित आणि विराट गेल्या दशकापासून भारतीय क्रिकेटचा कणा राहिले आहेत. दोघेही टीमचा महत्त्वाचा भाग आहेत.” आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला (Rohit Sharma and virat kohli) भारतासाठी 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही.

मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Chief selector of team india & Head Coach Gautam Gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे म्हणणे आहे की, केवळ अलीकडील कामगिरीच्या आधारावरच 2027 च्या वर्ल्ड कपसाठीची टीम निवडली जाईल.

त्यामुळे रोहित आणि विराटच्या सहभागाबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. सध्या रोहित आणि विराट भारतासाठी केवळ वनडे सामने खेळतात. या दोन्ही खेळाडूंनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती जाहीर केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---