शुमबन गिल याने रविवारी (24 सप्टेंबर) वनडे कारकिर्दीतील सहावे शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात गिल आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी पूर्ण केली. अय्यरने शतक करून विकेट गमावल्यानंतर काहीच चेंडूत शुबमनने आपले शतक पूर्ण केले. चालू वर्षात सलामीवीर फलंदाजाचे हे पाचवे शतक आहे.
शुबमन गिल () याने आशिया चषक 2023 मध्ये 9 दिवसांपूर्वीच बांगलादेशविरुद्ध 121 धावांची झंझावाती शतक केले होते. त्यानंतर रविवारी (24 सप्टेंबर) त्याने पुन्हा एकदा आपला फॉर्म दाखवून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील हा दुसरा सामना असून गिलने यामध्ये 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. भारताच्या डावातील 34 व्या षटकात कॅमरून ग्रीन याने त्याची विकेट घेतली. या षटकातील पाचवा चेंडू शुमबनने मोठ्या शॉटसाठी खेळला. पण चेंडू बॅटवर ठीक बसला नाही आणि हवेत उंच अडाल्यानंतर यष्टीरक्षक ऍलेक्स केरी याने झेल पकडला. भारतासाठी गिलच्या या शतकाआधी श्रेयस अय्यर यानेही शतक करून विकेट गमावली. अय्यरने 90 चेंडूत 105 धावा कुटल्या.
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्यूशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
महत्वाच्या बातम्या –
शुबमन-श्रेयसचे झंझावाती अर्धशतक, शतकी भागीदारीसह भारताची धावसंख्या 150च्या पार
Toss: विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने बदलला कर्णधार, भारताच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूची एन्ट्री