---Advertisement---

फलंदाजीतील ‘या’ दोषामुळे शुबमन शतकपासून राहतोय वंचित, पण आता मिळालाय कामाचा मंत्र

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 11:52 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सलामीवीर शुबमन गिलने पहिल्या सत्रात दमदार कामगिरी केली. त्याने आकर्षक अर्धशतक झळकावले. मात्र, दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात काईल जेमिसनच्या इनस्विंग चेंडूवर गिल त्रिफळाचीत झाला. यावेळी गिलच्या बॅट आणि पॅडमध्ये खूप अंतर होते आणि त्यामुळे चेंडू जाऊन स्टंपला लागला होता.

लक्षात घेण्यासारखे आहे की गिलने कसोटी पायचित किंवा त्रिफळाचीत होण्याची ही सहावी वेळ आहे. हा उजव्या हाताचा फलंदाज अशाप्रकारे बाद होण्याबाबत बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, ही मानसिक गोष्ट नसून तांत्रिक दोष आहे. कार्तिकने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, गिलने स्वत:ला क्रॉस शॉट्स खेळण्यापासून थांबवले पाहिजे. गिलने या तांत्रिक दोषावर मात केली तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारमध्ये तो यशस्वी होईल.

दिनेश कार्तिक म्हणाला, ‘त्याच्या फलंदाजीत तांत्रिक दोष आहे. तो अधिक क्रॉस जातो. जेव्हा तो चेंडूवर क्रॉस शॉट्स खेळण्याच्या स्थितीत असतो तेव्हा त्याला चेंडूला मारण्यासाठी हात फिरवावा लागतो. यामुळे बॅट-पॅडमधील अंतर वाढते. दुसरीकडे, जर तुम्ही चेंडूच्या मागे असाल आणि चेंडू तुमच्या दिशेने येऊ दिला तर तुम्ही चेंडू योग्यप्रकारे खेळाल. जेव्हा मी त्याची विकेट पाहिली तेव्हा हे स्पष्ट झाले की ही एक तांत्रिक अडचण आहे, ज्यावर त्याने काम करणे आवश्यक आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘यात मानसिक कारण काहीही नाही, कारण त्याला मोठी शतके कशी झळकावायची हे माहित आहे. ही एक तांत्रिक गोष्ट आहे ज्यावर त्याला काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून तो लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अधिक चांगली कामगिरी करत राहील आणि त्यामुळे त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही मदत होईल.’ शुभमन गिलने या सामन्यात ९३ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या.

गिलला मोठी खेळी करण्यात कसलीही अडचण नाही 
३६ वर्षीय दिनेश कार्तिकने सांगितले की, ‘शुभमन गिलला त्याची सुरुवात मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करण्यात कोणतीही अडचण नाही. गिलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही द्विशतके झळकावली आहेत. गिलने प्रत्येक वेळी देशांतर्गत शतक झळकावले की, त्याचे दुहेरी किंवा २५० पेक्षा जास्त धावसंख्येमध्ये रूपांतर केले आहे.’

महत्वाच्या बातम्या-

ऍशेस मालिकेसाठी सज्ज होतोय बेन स्टोक्स, गाबामध्ये इंग्लिश गोलंदाजांची केली जोरदार धुलाई- Video

ग्रीन पार्कच्या वादात राहिलेल्या क्युरेटरचा खुलासा; म्हणाला, ‘मला इलेक्ट्रिशियन वरून पिच क्युरेटर करण्यात आले’

चढले तेज हळदीचे! राजस्थान रॉयल्सचा राहुल तेवतिया चढणार बोहल्यावर, हळदी समारंभाचे फोटो केले शेअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---