पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत पुरुष गटात अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल यांनी तर, महिला गटात बेला ताम्हणकर, छावना मल्लीला श्रीनाथ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अव्वल मानांकित तीर्थ माचीलाने सिद्धार्थ जडलीचा 9-0असा तर, नवव्या मानांकित अभिषेक शुक्लाने पुनीत धोकेचा 9-2असा सहज पराभव केला. दुसऱ्या मानांकित मेघभार्गव पटेल याने नागुश नाईकवर 9-0असा विजय मिळवला.
महिला गटात छावना मल्लीला श्रीनाथ व बेला ताम्हणकर यांनी अनुक्रमे अनिशा थडा रेड्डी व मैत्री पटेल यांचा 9-4अशा सारख्याच फरकाने पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: पुरुष गट:
तीर्थ माचीला(1)वि.वि.सिद्धार्थ जडली 9-0;
अभिषेक शुक्ला(9)वि.वि.पुनीत धोके 9-2;
मेघभार्गव पटेल(2) वि.वि.नागुश नाईक 9-0;
गोविंद मोहन वि.वि.चैतन्य पालदे 9-0;
महिला गट:
नारीम रेड्डी वि.वि.कल्लुरी रेड्डी 9-5;
छावना मल्लीला श्रीनाथ वि.वि.अनिशा थडा रेड्डी 9-4;
बेला ताम्हणकर वि.वि.मैत्री पटेल 9-4.