भारतीय स्टार बॅटमिंटनपटू पारूपल्ली कश्यपने पासपोर्ट हरवल्याने भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी मदतीसाठी सपंर्क साधला आहे. तो ओडेन्स येथे होणाऱ्या डेन्मार्क ओपनसाठी जात असताना अॅमस्टरडॅममध्ये त्याचा पासपोर्ट हरवला.
“माझा पासपोर्ट अॅमस्टरडॅम येथे हरवला असून मला पुढे डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपन आणि जर्मनीत होणाऱ्या सॅलोक्स ओपनसाठी प्रवास करायचा आहे. डेन्मार्कला जाण्यासाठी माझे टिकिट 14 ऑक्टोबरचे असून याबाबतीत मला तुमची मदत हवी आहे”, असे कश्यपने ट्विटरवरून स्वराज यांना या घटनेही माहिती दिली.
तसेच त्याने या ट्विटला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनाही टॅग केले आहे.
Good Morning Ma’am, I’ve lost my passport at Amsterdam last night . I have to travel to Denmark Open, French Open and Saarloux Open,Germany . My ticket for Denmark is on Sunday, 14th October .I request help in this matter . @SushmaSwaraj @Ra_THORe @himantabiswa @narendramodi
— Kashyap Parupalli (@parupallik) October 13, 2018
कश्यपने 2014ला ग्लास्गोच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. त्याने बॅडमिंटनमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत 6 वे स्थानही मिळवले होते. पण त्यानंतर त्याला दुखापतीने घेरल्याने त्याची प्रगती खुंटली.
तसेच कश्यप या वर्षी 16 डिसेंबरला भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराटसोबतचा सेल्फी पडला महागात, चुकवावी लागणार मोठी किंमत
–अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय
–सातत्याने अपयशी ठरणाऱ्या केएल राहुलवर चाहत्यांची सोशल मिडियातून टीका