आयपीएलमध्ये सनरायझर्स संघासाठी खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सिद्धार्थ कौल आणि त्याची पत्नी हरसिमरन कौरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थची पत्नी हरसिमरन कौरने त्यांच्या मुलाला जन्म दिला.
सिद्धार्थ कौलने स्वत:च ट्विट करत ही माहिती दिली. ट्विट करत सिद्धार्थ म्हणाला, “मला ही गोष्ट जाहीर करतांना अतिशय आनंद होतो आहे. १७ फेब्रुवारी २०२१ रोजीला आम्हाला मुलगा झाला. तुमच्या आशीर्वादांसाठी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत.” सिद्धार्थ आणि हरसिमरन कौरने २०२१ मध्ये लग्न केले होते.
The #SRHFamily has a new member 🧡
Congratulations to @iamsidkaul and Harsimran Kaur on being blessed with a baby boy 👶#OrangeArmy #SRH pic.twitter.com/HaD8meWmPd
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 21, 2021
सिद्धार्थ कौलची कारकीर्द
उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौल देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळतो. कौल हा 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होता. त्यावेळी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आदेशावरून त्याने शेवटच्या षटकात गोलंदाजी करत संघाच्या विजयाला योगदान दिले होते. संपूर्ण विशवचषकात 5 सामन्यात त्याने 10 विकेट्स घेतल्या होत्या. भारताकडून त्याने आत्तापर्यंत तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल लिलावात मिळाला नाही भाव, पठ्ठ्याने सेंचूरी मारत फलंदाजीत दाखवला ताव; बघा कोण आहे तो?
जड्डूच्या एका सल्ल्याने बदलले टेम्पो चालकाच्या मुलाचे आयुष्य, आता गाजवणार आयपीएलचं मैदान
इंजीनियरिंग केलेला अश्विन प्रत्येक सामन्यानंतर काय लिहितो? एकदा वाचून पाहा मग कळेलं