विम्बल्डनच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरु असून कनिष्ठ गटातही तीन खेळाडू खेळत आहेत. त्यात भारताच्या झील देसाई, सिद्धांत बांठिया व महेक जैन या खेळाडूंचा समावेश आहे.
विशेष म्हणजे सिद्धांत बांठिया व महेक जैन हे दोन्ही खेळाडू महाराष्ट्रीयन आहेत. गुजरातच्या झील देसाईने कनिष्ठ गटात मुलींच्या एकेरीची दुसरी फेरी गाठली असून पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या सिद्धांतला पहिल्या फेरीत फ्रान्सच्या मॅट मार्टिनेऊ याच्याशी आज खेळावे लागणार आहे.
सिद्धांत प्रमाणेच महेकनेही पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. तिचा सामना क्रोएशियाच्या लिआ बोस्कोव्हिचशी होणार आहे. १६ वर्षीय महेक जैनचा जन्म २४ जून २००१ चा असून ती जागतिक क्रमवारीत ८८४व्या स्थानावर आहे .
सिद्धांतचा सामना स्थानिक प्रमाणवेळेनुसार कोर्ट नंबर ९ वर ११ वाजता सुरु होईल तर महेकचा सामना कोर्ट नंबर १५ वर ११ वाजता सुरु होणाऱ्या पहिल्या दोन सामान्यांच्या नंतर होईल.