प्रो कबड्डी सीजन ६ पासून सिद्धार्थ देसाई हे नाव खूप चर्चेत आहे. सीजन ६ मध्ये यु मुंबा कडून खेळताना कबड्डीत आपली वेगळी छाप पाडली. पर्दापणाच्या सीजन मध्येच आपली ओळख निर्माण करणारा खेळाडू स्टार झाला. ६५ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार सिद्धार्थ यंदा महाराष्ट्र संघात प्रमुख रेडरची भूमिका निभावनार अशी सर्व कबड्डी रसिकांना आशा होती. पण रोहा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतून सिद्धार्थ देसाईला महाराष्ट्र संघातील स्थान गमवावे लागले आहे.
अलिबाग येथे महाराष्ट्र संघाच्या शिबिरात सहभाग झालेल्या सिद्धार्थची महाराष्ट्राच्या अंतिम १२ मध्ये खेळण्याची इच्छा होती. परंतु तो रेल्वेचा खेळाडू असून त्याने रेल्वेच्या आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेत दक्षिण-मध्य रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला गौरविण्यात आले होते.
महाराष्ट्र संघात खेळण्यासाठी सिद्धार्थ देसाईने रेल्वेचा राजीनामा दिला, पण रेल्वेने त्याचा राजीनामा स्वीकारला नाही. रेल्वे कडून “ना हरकत प्रमाणपत्र” हे त्याला मिळत नसल्यामुळे त्याला महाराष्ट्र संघात खेळता येणार नाही चित्र स्पष्ट झाले आहे. रेल्वेकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न मिळाल्यामुळे महाराष्ट्र संघातून खेळण्याची परवानगी नाही. सिद्धार्थने राजीनामा दिला असला तरी त्याची मंजुरी आणि अन्य तांत्रिक बाबींमूळे त्याला ६६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळता येणार नाही.
महाराष्ट्र संघातील स्थान गमवावे लागल्यामुळे आता सिद्धार्थ देसाई राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळणार नाही. रेल्वेच्या सराव शिबिरात उपस्थित न राहल्यामुळे रेल्वेच्या अंतिम १२ मध्ये सिद्धार्थ देसाईला स्थान मिळेल की नाही यात शंका आहे. जर रेल्वे संघातून ही खेळण्याची संधी मिळाली नाही तर स्टार सिध्दार्थ देसाई ६६ व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळू शकणार नाही.