---Advertisement---

MPL 2025: फायनलमध्ये सिद्धेश वीरचा नॉट आऊट धमाका

On: रविवार, जून 22, 2025 11:07 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्स व रायगड रॉयल्स आमने-सामने आले. गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर रायगड रॉयल्सने 190 अशी मोठी मजल मारली. संघाचा अनुभवी सलामीवीर सिद्धेश वीर याने अखेरपर्यंत नाबाद राहत 99 धावांची अविस्मरणीय खेळी केली.

प्रथमच प्ले ऑफ्समध्ये प्रवेश केलेल्या रायगड रॉयल्सने सलग दोन विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. मात्र, संघाचा सलामीवीर विकी ओस्तवाल हा पहिल्याच चेंडूवर मुकेश चौधरीचा शिकार ठरला. त्यानंतर सिद्धेश वीर व युवा हर्ष मोगावीरा ही जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 111 धावांची मोठी भागीदारी रचली. हर्ष 39 चेंडूंमध्ये 48 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या निरज जोशी याने आक्रमक 27 धावा केल्या.

सहकाऱ्यांनी केलेल्या खेळाला सिद्धेश वीर याने आपल्या फलंदाजाने चार चांद लावले. सिद्धेश याने केवळ 59 चेंडूंमध्ये नाबाद 99 धावांची खेळी केली. यामध्ये 11 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 167 पेक्षा जास्त राहिला. सिद्धेशने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण खेळ करताना 11 सामन्यात तब्बल 450 धावा केल्या. यामध्ये एक शतक व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---