गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना झाला. यात प्रथम फलंदाजी करत हैदराबादने २०१ धावांचा डोंगर उभा केला. याबरोबर पंजाब संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने तब्बल २० वेळा आयपीएलमध्ये २०० किंवा अधिक धावा दिल्या आहेत. पंजाबसारखी खराब कामगिरी आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने केली नाही. आयपीएलमध्ये २०० किंवा अधिक धावा करणे म्हणजे जिंकण्याचा मुळमंत्रच आहे.
या विक्रमात पंजाबपाठोपाठ रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ आहे. विराट नेतृत्त्व करत असलेल्या या संघाने १७ वेळा ही नकोशी कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने १२, चेन्नई सुपर किंग्जने १२, राजस्थान रॉयल्सने ११ तर कोलकाता नाईट रायडर्सने १० वेळा हा नकोसा कारनामा केला आहे.
दुसऱ्या बाजूला हैदराबाद संघ २०० किंवा अधिक धावा वाचवताना केवळ एकदा पराभूत झाला आहे. अशा सामन्यांत त्यांनी तब्बल ८ वेळा विजय मिळवला असून एकदा पंजाबने त्यांच्याविरुद्ध २०० धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-करुन दाखवलं! वॉर्नरने आयपीएलमध्ये जे केलंय ते ना विराट ना रोहितला जमलंय
-केदार जाधवची सीबीआय चौकशी करा, चाहत्यांनी केली अजब मागणी
-दुःखद ! आर अश्विनच्या संघसहकाऱ्याने घेतला जगाचा निरोप