डब्लिन। भारतीय संघ आज, 29 जूनला आयर्लंड विरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यातून मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौल भारताकडून आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.
याची माहीती बीसीसीआयने सोशल मिडियावरुन दिली आहे. त्याला आज सामन्यापूर्वी भारताची कॅप भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या हस्ते देण्यात आली.
सिद्धार्थ भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 358 वा, तर टी20 मध्ये पदार्पण करणारा भारताचा 75 वा खेळाडू ठरला आहे.
यावर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून दमदार कामगिरीने सिद्धार्थ कौलने सर्वांचे लक्ष वेधले होते. तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला होता. त्याने आयपीएल 2018 मध्ये 17 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत.
या कामगिरीच्या जोरावर त्याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. याबरोबरच त्याची मागील दोन मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी झाली आहे.
त्याने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 52 सामन्यात 27.37 च्या सरासरीने 182 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये 61 सामन्यात 22.98 च्या सरासरीने 112 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
भारताने आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवून 2 सामन्याच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज भारतीय संघ दुसरा सामना जिंकून आयर्लंडला व्हाईटवॉश देण्यास उत्सुक असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–स्मिथला खेळताना पाहुन राशीद खानने असा व्यक्त केला आनंद!
–टीम इंडिया रिलॅक्स, डब्लिन शहरात घेतेयं सहलीचा आनंद
–रोनाल्डोच्या पोर्तुगालचं पुढच्या सामन्यात पराभूत होण्याच लाॅजिक रेस ३ पेक्षाही वाईट