सध्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 साठी क्वॉलिफायर सामने खेळले जात आहे. यामध्ये मंगळवारी (20 जून) नेदरलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात आमना सामना झाला. उभय संघांतील या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने या सामन्यातर वैयक्तिक शतक ठोकले आणि गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्या. रझाच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे झिम्बाब्वे संघ 120 धावांनी जिंकला. सोबत रझाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद देखील झाली.
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा (Sikandar Raza) याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला नेदरलंड संग 50 षटकांमध्ये 6 बाद 315 धावांपर्यंत पोहोचला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 316 धावांचे लक्ष्य अवघ्या 40.5 षटकांमध्ये गाठले. सिंकदर रझाने अवघ्या 54 चेंडूत 102* धावांची वादळी खेळी केली. झिम्बाब्वे क्रिकेट संघासाठी ही एकाद्या फलंदाजाने केलेल सर्वात वेगवान वनडे शतक ठरले आहे. गोलंदाजाची भूमिका पार पाडताना रझाने 10 षटकात 55 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. विश्वचषका क्वॉलिफायर्समधील झिम्बाब्वेचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी सीन विलियम्सने 70 चेंडूत शतक ठोकले होते आणि झिम्बाब्वेसाठी सर्वात वेगवान वनडे शतक करणारा फलंदाज बनला होता. पण रझाने मंगळवारी विलियम्सनचाही विक्रम मोडीत काढला.
झिंबाव्बेकडून जलद वनडे शतक करणारे फलंदाज
54 चेंडू- सिकंदर रझा, विरुद्ध नेदरलॅंड, 2023
70 चेंडू- सीन विलियम्स, विरुद्ध नेपाळ, 2023
73 चेंडूृ- रेगिज चाकाब्वा, विरुद्ध बांगलादेश, 2022
79 चेंडू- ब्रेंडन टेलर, विरुद्ध आयर्लंड, 2015
रझा झिम्बाब्वेसाठी सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज बनला असला, तरी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम एबी डिविलियर्सच्या नावावर आहे. त्याने 31 चेंडूत शतकी खेळी केली होती. शिवाय 44 चेंडूत 149 धावा केल्या होत्या. 2015 साली केलेल्या या खेळीत 16 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. भारताकडून विराट कोहलीने सर्वात जलद शतकी खेळी केली आहे. 2013 साली जयपुरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 52 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या होत्या.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतकी खेळी करणारे फलंदाज
31 चेंडू- एबी डिविलियर्स, विरुद्ध वेस्ट इंडिज
36 चेंडू- कोरी ॲंडरसन, विरुद्ध वेस्ट इंडिज
37 चेंडू- शाहिद आफ्रिदी, विरुद्ध श्रीलंका
41 चेंडू- असीफ खान, विरुद्ध नेपाळ
44 चेंडू- मार्क बाऊचर, विरुद्ध झिंबाब्वे
महत्वाच्या बातम्या –
शुबमन गिल-सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत; सचिनची लेक लवकरच तेंडुलकर आडनाव लावणं बंद करणार!
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ केदारची खणखणीत खेळी, पाहा किती षटकारांची केलीय अतिषबाजी