---Advertisement---

अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येवू नये!

On: गुरूवार, मार्च 15, 2018 10:49 AM
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश टी२० सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत १७ धावांनी विजय मिळवला. रोहीत शर्माने या सामन्यात ८९ तर सुरेश रैनाने ४७ धावा केल्या. 

गोलंदाजीत वाॅशिंगटन सुंदरने ४ षटकांत २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. 

परंतु या सामन्यात मोहम्मद सिराज या गोलंदाजाला एका नकोशा अशा विक्रमाला सामोरे जावे लागले. त्याच्या गोलंदाजीवर या सामन्यात ४ षटकांत तब्बल ५० धावा काढण्यात आल्या. 

नोव्हेंबर महिन्यात पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने आजपर्यंत ३ टी२० सामने खेळले असुन त्यात न्यूझीलॅंड विरुद्ध ५३, श्रीलंकेविरुद्ध ४५ तर कालच्या सामन्यात ५० धावा दिल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ७२ चेंडूत त्याने १४८ धावा दिल्या आहेत. पहिल्या ३ सामन्यानंतर सर्वाधिक धावा देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सिराज आला पहिला असून त्याने अॅडम मिल्नेचा १३० धावांचा नकोसा असा विक्रम मोडला आहे. 

https://twitter.com/ca_jigarzaveri/status/974004874064089088

https://twitter.com/Smile_Buddy17/status/974000348254916609

https://twitter.com/abdul351/status/973995998748983297

https://twitter.com/asli_ritik04/status/973989162197008384

https://twitter.com/MallickJayant/status/973980914702344193

https://twitter.com/rahman_shazar/status/973975359539433472

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment