लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला होता. .यासह भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सिराजने या सामन्यातील दोन्ही डावात प्रत्येकी 4-4 बळी घेतले होते.
दरम्यान त्याच्या गोलंदाजीसह त्याच्या अनोख्या जल्लोषानेही सर्वांचे लक्ष वेधले होते. आता त्याच्या जल्लोषाच्या स्टाईलचा चाहत्यांनी चक्क मोठा कट आऊट तयार केला आहे.
सिराजने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 94 धावा देऊन चार बळी तर दुसऱ्या डावात 32 धावा देऊन चार बळी घेतले होते. सिराज लॉर्ड्स बोर्डावर आपले नाव नोंदवण्याच्या अगदी जवळ आला होता. परंतु त्याच्याकडे एक विकेट कमी असल्याने हे होऊ शकले नाही. मात्र, सिराजने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर खूप शाबासकी मिळवली. विकेट घेतल्यानंतर सिराजची आनंद साजरा करण्याची पद्धत देखील खूप चर्चेत राहिली.
https://www.instagram.com/p/CSzRd4MJiZR/?utm_source=ig_web_button_share_sheet
किंबहुना जेव्हाही सिराजने इंग्लिश फलंदाजांना आपला बळी ठरवले, तेव्हा त्याने तोंडावर बोट ठेवून विकेट घेतल्याचा आनंद साजरा केला. त्याच्या या आनंद साजरा करण्याच्या शैलीची खूप चर्चा झाली आहे. त्याची जल्लोष साजरा करण्याची ही पद्धत आधीच आयकॉनिक बनली आहे. अशात आता हैदराबादमधील सिराजच्या शेजाऱ्यांनी त्याच्या या जल्लोष साजरा करण्याचा शैलीचा मोठा ‘कट आउट’ शहरात उभारला आहे.
Siraj is a Superstar, Miyan getting all the love from the cricket fans. pic.twitter.com/aKG9l00181
— Johns. (@CricCrazyJohns) August 19, 2021
A huge cut out of #Siraj with his iconic 'Finger on Lips' celebration somewhere in #Hyderabad. He's truly going to be the next big thing in world cricket. He's already a superstar.#TeamIndia pic.twitter.com/MUCSWuQ2n1
— Backchod Indian (@IndianBackchod) August 21, 2021
लॉर्ड्स कसोटी दरम्यान आपल्या या जल्लोषाबद्दल सिराजने सांगितले होते की, “मी माझ्यावर उलट सुलट टीका करणाऱ्यांसाठी अशा पद्धतीने जल्लोष साजरा करतो. मी जर तशा पद्धतीने बोलू शकत नसेल, तर आता माझा चेंडू त्यांना उत्तर देईल. आनंद साजरा करण्याची ही माझी नवीन पद्धत आहे.”
दरम्यान येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने मोठे बदल केले आहेत. लॉर्ड्स कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळलेला हसीब हमीद आता रोरी बर्न्ससोबत सलामीला दिसणार आहे. त्याचबरोबर जगातील प्रथम क्रमांकाचा टी20 फलंदाज डेविड मलानला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हे पोरगं गजब आहे! पंतचे चक्क इंग्लंडकडून यष्टीरक्षण; समालोचक म्हणे, ‘उभ्या आयुष्यात असं पाहिलं नाही’
‘कर्णधार कोहलीच्या आदेशानंतरच बुमराहने इंग्लंडच्या खेळाडूला जखमी करण्याचा प्रयत्न केला’