क्वाललंपुर | आज भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप टी२०च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. भारताला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विजय महत्त्वाचा होता नाहीतर बांगलादेश संघाच्या कामगिरीवर सर्व गणित अवलंबुन होती.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकुण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा संपुर्ण डाव २० षटकांत ७ बाद ७२ वर संपुष्टात आला. भारताकडून एकता बिश्तने ३ तर शिखा पांडे, अनुजा पाटील, पुनम पाटील आणि दिप्ती यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानकडून सना मीरने सर्वाधिक २० धावा केल्या.
२० षटकांत ७३ धावांच लक्ष मैदानात घेऊन मैदानात आलेल्या भारतीय संघाने १६.१ षटकांत ३ विकेट गमावत ७५ धावा करत हे लक्ष पार केले. भारताकडून सलामीविर मिताली राजला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही, तर स्म्रिती मंधानाने ३८ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दिप्ती शर्मालाही भोपळा फोडता आला नाही.
कर्णधार हरमनप्रीत कौर (३४) आणि अनुजा पाटील (०) यांनी कोणतीही पडझड होऊ न देता संघाला विजय मिळवुन दिला.
भारताचा एशिया कप विजेतेपदाचा सामना पाकिस्तान किंवा बांगलादेश संघासोबत होऊ शकतो. आज जर बांगलादेश संघ जिंकला तर हा सामना भारत विरुद्ध बांगलादेश असाच होणार आहे. जर बांगलादेश पराभुत झाला तर हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा होणार आहे.
या स्पर्धेतील साखळी फेरीचा सामना आज दुपारी बांगलादेश विरुद्ध मलेशिया संघाता दुपारी ११ वाजता होणार आहे.






