सहा वेळची विश्वविजेती महिला बॉक्सर मेरी कॉम हिने मोठी घोषणा केली. मेरी कॉमने आगामी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिवमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत मेरीने आठ पदके जिंकली असून या मोठ्या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना थक्का बसला आहे. दुखापतीच्या कारणास्तव तिने हा निर्णय घेतला.
मेरी कॉम (Mary Kom) हिचे वय सध्या 40 वर्ष असून दुखापतीच्या कारणास्तव ती यावर्षीच्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाहीये. हा निर्णय घेत असताना तिने दुखापतीचे कारणा सांगितले, पण नेमकी कोणती दुखापत झाली, याविषयी मात्र कुठलीच ठोस माहिती दिली नाही. यावर्षी आयबीए (IBA) जागतिक चॅम्पियनशिप यावर्षी 1 मे पासून 14 मे पर्यंत उज्बेकिस्तानमध्ये आयोजित केली गेली आहे.
मेरी कॉम या प्रमुख स्पर्धेतून माघार घेण्याचे कारण सांगितले की, “मी दुखापतीच्या कारणास्तव आयबीए महिला विश्व चॅम्पियनशिप 2023 मध्ये भाग घेत नाहीये. मी लवकरच तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत आहे. मला आशा आहे की, आपल्याला या चॅम्पियनशिपनंतर अजून चॅम्पियन बॉक्सर्स मिळू शकतात. मी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देते.”
दरम्यान, मेरी कॉमला मागच्या वर्षी बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समधूनही माघार घ्यावी लागली होती. कॉमनवेल्थ गेम्समधून माघार घेण्याचे कारण होते मेरी कॉमच्या गुडघ्याला झालेली दुखापत. 48 किलो वजनीगटात सेमीफायनल सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तिचा गुडघा मुडपला होता. सामन्याच्या पहिल्याच फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूचा पंच हुकवण्याच्या प्रयत्नात मेरीकॉम कॅनवसवर पडली होती. यावेळी तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती.
जागतिक चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून मेरी कॉमची ओळख आहे. कारकिर्दीतील पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक वेळी पदक जिंकणारी ती पहिली महिला बॉक्सर आहे. तसेच बॉक्सिंगमध्ये आठ जागतिक चॅम्पियनशिपची पदके जिंकणारी (पुरुष आणि महिला) पहिली बॉक्सर आहे. 2014 साली पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले होते आणि तसेच 2018 साली कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने सूवर्णपदक जिंकले होते. या दोन स्पर्धांमध्ये सूवर्णपदक जिंकणारी मेरी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. 2021 साली लंडन ऑलिम्पिकमध्येही तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. (Six-time world champion Mary Kom withdraws from World Women’s Boxing Championship)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून जसप्रीत बुमराहचा पत्ता कट
BREAKING! दिग्गज क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेटप्रेमींना धक्का