काल भारताच्या साईना नेहवाल आणि पीव्ही सिंधू या दोन भारताच्या बॅडमिंटनपटूने काल महिला एकेरीत दोन पदके निश्चित केली. दोघीही खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे त्यांची कमीतकमी कांस्यपदक निश्चित झाली आहेत.
भारतीय खेळाडूंनी यापूर्वी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगीरी केली आहे. भारताच्या नावावर १९८३ सालापासून ते २०१६ पर्यंत ५ पदके आहेत.
पुरुष एकेरीमध्ये एक, महिला दुहेरीमध्ये एक आणि महिला एकेरीमध्ये दोन अशी भारताने आजपर्यंत पदके जिंकली आहे.
#१ प्रकाश पदुकोण:
भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी १९८३ साली जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
#२ अश्विनी पोनप्पा- ज्वाला गुट्टा
पदकाचा रंग बदलला अश्विनी पोनप्पा- ज्वाला गुट्टा जोडीने २०११ पुन्हा एकदा भारताला कांस्यपदक जिंकून दिले.
#३ पीव्ही सिंधू
भारताच्या पीव्ही सिंधू हिने २०१३ साली पहिल्यांदा जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. हे भारताचे महिला एकेरीमधील पहिले पदक होते.
#४ साईना नेहवाल
महिला एकेरीमधील भारताचे दुसरे पदक साईना नेहवालच्या रौप्य पदकाच्या रूपाने २०१५ साली आले. भारताची ही आजपर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आहे.
#५ पीव्ही सिंधू
२०१४ साली भारताच्या पीव्ही सिंधूने दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकून एक नवा विक्रम केला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनली.
#६ / #७
यावर्षी भारतीय खेळाडू साईना नेहवाल आणि पीव्ही सिंधू ह्या दोन खेळाडूंनी ह्या वर्षी पदके निश्चित केली आहेत. त्यामुळे ही पदके मिळून भारताची एकूण या स्पर्धेतील पदके ७ होतील.