भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे. तो मैदानावर धावा काढत आहे, विकेट्स घेत आहे आणि शानदार क्षेत्ररक्षणही करत आहे. याव्यतिरिक्त तो कर्णधार म्हणूनही शानदार कामगिरी करत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यातून पंड्याच्या फॉर्मचा प्रत्यय येतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला 168 धावांनी धूळ चारत मालिका 2-1ने खिशात घातली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पृथ्वी शॉ याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, मालिका जिंकल्यानंतर पंड्याने असे काही केले, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
कर्णधार हार्दिक पंड्या (Captain Hardik Pandya) याने ही मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी हातात घेतली. त्यानंतर लगेच त्याने ही ट्रॉफी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याकडे सोपवली. त्यावेळी पृथ्वीचा आनंद पाहण्यासारखा होता. बीसीसीआयने यादरम्यानचा व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.
Captain @hardikpandya93 collects the @mastercardindia trophy from BCCI president Mr. Roger Binny & BCCI Honorary Secretary Mr. Jay Shah 👏👏
Congratulations to #TeamIndia who clinch the #INDvNZ T20I series 2️⃣-1️⃣ @JayShah pic.twitter.com/WLbCE417QU
— BCCI (@BCCI) February 1, 2023
पृथ्वी शॉने 2021मध्ये खेळला होता शेवटचा टी20 सामना
विशेष म्हणजे, पृथ्वीला दीर्घ काळानंतर भारताच्या टी20 संघात स्थान मिळाले होते. मात्र, तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अंतिम अकरामध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पृथ्वी शॉ याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना जुलै 2021मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांचे प्रदर्शन निराशाजनक होते. अशात तिसऱ्या टी20त पृथ्वीला संधी मिळेल, असे बोलले जात होते. संघ व्यवस्थापनाने निर्णायक टी20 सामन्यात गिल आणि किशन यांच्यावरच विश्वास ठेवला. यावेळी गिलने शतक झळकावले, तर किशन पुन्हा अपयशी ठरला.
पृथ्वीने त्रिशतक ठोकत केले होते संघात पुनरागमन
पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफी सामन्यात आसामविरुद्ध 379 धावांची खेळी साकारत भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला होता. सामन्याबाबत बोलायचं झालं, तर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना गिलच्या नाबाद 126 धावांच्या जोरावर 234 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 66 धावांवरच सर्वबाद झाला. त्यांच्या फक्त 2 फलंदाजांना 10 धावांचा आकडा पार करता आला. अशाप्रकारे भारताने हा सामना 168 धावांनी खिशात घातला. (skipper hardik pandya wins hearts by handing trophy to prithvi shaw ind nz t20 series see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जम्मू- काश्मीर एक्सप्रेस सुसाट! चेंडूचा वेगच इतका की, थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊन पडल्या बेल्स
वन ऍण्ड ओन्ली हार्दिक! टी20 क्रिकेटमध्ये पंड्याशिवाय ‘त्या’ कामगिरीच्या जवळपासही कोणी नाही