‘टेबल टॉपर’ राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल 2023 स्पर्धेच्या 26व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नमवले. या विजयात काईल मेयर्स याच्यासह अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि गोलंदाज आवेश खान यांनी सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह लखनऊने गुणतालिकेत 8 गुणांसह दुसरे स्थान आपल्याकडे कायम ठेवले. या विजयानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल म्हणाला की, तो कर्णधार म्हणून काही ना काही चुकीचे करत आहे. त्यामुळे त्याच्या संघसहकाऱ्याने फेकलेला चेंडू त्याला लागला. याव्यतिरिक्त त्याने असेही म्हटले की, या खेळपट्टीवर 160 धावा पुरेशा होत्या.
काय म्हणाला राहुल?
सामना जिंकल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने त्याच्या संघाच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मला माझ्या संघसहकाऱ्याचा थ्रो येऊन थेट लागला, त्यावरून स्पष्ट होते की, एक कर्णधार म्हणून मी काही ना काही चुकीचे करत आहे. 10 षटकांनंतर मला आणि काईल मेयर्सला सांगण्यात आले होते की, ही 160 धावांची खेळपट्टी आहे. राजस्थान रॉयल्सकडे चांगले गोलंदाज होते, ज्यांनी परिस्थितीचा पूर्ण फायदा उचलला. आम्ही 10 धावा नक्कीच मागे राहिलो, पण गोलंदाजीतून त्याची भरपाई केली.”
पुढे बोलताना राहुल म्हणाला की, “माझ्यामते अमित मिश्रा याने जे धावबाद केले आणि दोन सलग विकेट पडले, त्यामुळे आम्ही सामन्यात पुनरागमन केले. राजस्थान रॉयल्सची ताकद त्यांचे अव्वल 4 फलंदाज आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना बाद करायचे होते.”
Marcus Stoinis is adjudged Player of the Match for his all-round performance here in Jaipur as @LucknowIPL win by 10 runs.
Scorecard – https://t.co/gyzqiryPIq #TATAIPL #RRvLSG #IPL2023 pic.twitter.com/UxB8QJ9Bz0
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
सामन्याचा आढावा
बुधवारी (दि. 19 एप्रिल) जयपूर येथे खेळण्यात आलेल्या 26 व्या सामन्यात राजस्थान संघाला 10 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 144 धावाच करता आल्या. दोन्ही संघाकडून खेळाडूंनी मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण खेळपट्टी संथ असल्यामुळे फटके मारणे कठीण झाले होते. आता या विजयानंतर लखनऊचे 6 सामन्यात 8 गुण झाले आहेत. (skipper kl rahul reacts on lsg win vs rajasthan royals in 26th match ipl 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रियान परागमुळेच हारली राजस्थान…’, लखनऊने रॉयल्सचा धुव्वा उडवताच रवी शास्त्रींची तिखट प्रतिक्रिया
एकच मारला कच्चून मारला! बटलरने भिरकावला हंगामातील दुसरा सर्वात लांब षटकार, गंभीरची रिऍक्शन पाहाच