---Advertisement---

धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल

MS-Dhoni-And-Krishnappa-Gowtham
---Advertisement---

एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी (दि. 3 एप्रिल) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये शानदार विजय मिळवला. चेन्नईने या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला 12 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यानंतर लखनऊ संघाचा अष्टपैलू कृष्णप्पा गौथमची मुलगी आणि एमएस धोनी यांच्यातील एक खास क्षण व्हायरल झाला आहे. आयपीएल 2023 स्पर्धेतील सहाव्या सामन्यातील हा क्षण चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. धोनीने यानंतर गौथमच्या कुटुंबीयांसोबत फोटोही काढले.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 217 धावा केल्या होत्या. या धावा करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने 57 धावा केल्या होत्या. तसेच, डेवॉन कॉनवे याने 47 धावांचे योगदान दिले होते. या दोघांमध्ये 110 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर गोलंदाजीत मोईन अली याने लखनऊच्या 4 विकेट्स घेतल्या. यावेळी लखनऊला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 205 धावाच करता आल्या.

सामन्यानंतर चेन्नईच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करण्यात आला. यामध्ये एमएस धोनी (MS Dhoni) गौथमच्या कुटुंबासोबत चर्चा करताना दिसला. पहिल्या फोटोत धोनी गौथमच्या मुलीसोबत खेळताना दिसत आहे. धोनी गौथमच्या मुलीसोबत ‘हाय फाईव्ह’ करत आहे. तसेच, दुसऱ्या फोटोत गौथम आणि त्याच्या कुटुंबासोबत धोनीने फोटो काढला आहे. चेन्नईने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक सुंदर रियुनियन.”

https://twitter.com/ChennaiIPL/status/1642964221859352576?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642964221859352576%7Ctwgr%5E448c056e5f1e25496d9c83dbe69b9dbd889f06ab%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fms-dhoni-gives-a-high-five-to-lsg-all-rounder-krishnappa-gowthams-daughter-picture-goes-viral-1079303

खरं तर, गौथम हा 34 वर्षांचा असून तो आयपीएल 2021मध्ये चेन्नईचा भाग होता. सोमवारी आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना त्याने फक्त 1 षटक टाकले. यामध्ये तो महागडा ठरला. त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याने 20 धावा खर्च केल्या. तसेच, फलंदाजी करताना त्याने 11 चेंडूत 17 धावा केल्या.

चेन्नईचा पुढील सामना
चेन्नई सुपर किंग्स संघाचा पुढील सामना शनिवारी (दि. 8 एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. (skipper ms dhoni gives a high five to lsg all rounder krishnappa gowthams daughter photo viral see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रश्मिकाला नाचताना पाहून स्वत:ला रोखू शकले नाहीत गावसकर, लावले जोरदार ठुमके; पाहा व्हिडिओ
याला म्हणतात धोनी प्रेम! ‘माही’ला टीव्हीवर पाहताच चाहत्याने ओवाळली आरती, व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---