मागील दोन सामन्यांत पराभवाचं पाणी पिऊन आलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ गुरुवारी (दि. 20 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध उतरला होता. मात्र, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम येथे पार पडलेल्या आयपीएल 2023 हंगामातील 28व्या सामन्यात कोलकाताला दिल्लीकडून 4 विकेट्सने दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे स्पर्धेतील सलग तिसरा आणि एकूण चौथा पराभव कोलकाताच्या पारड्यात पडला. या सामन्यात कोलकाताची फलंदाजी वाईटरीत्या फ्लॉप ठरली. कर्णधार नितीश राणाने पराभवाची जबाबदारी घेतली. यावेळी त्याने खेळपट्टीलाही जबाबदार ठरवले.
दिल्ली विरुद्ध कोलकाता (Delhi vs Kolkata) सामन्यात नाणेफेक जिंकत डेविड वॉर्नर (David Warner) याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व विकेट्स गमावत 127 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने 19.2 षटकात 6 विकेट्स गमावत 128 धावा केल्या आणि 4 विकटे्सने सामना जिंकला.
For his impressive bowling spell and 2⃣ crucial wickets, @ImIshant receives the Player of the Match award in his first game of #TATAIPL 2023 ????????@DelhiCapitals win by 4⃣ wickets against #KKR
Scorecard ▶️ https://t.co/CYENNIiaQp #DCvKKR pic.twitter.com/aRZjtrTvHa
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
काय म्हणाला राणा?
नितीश राणा याने सामन्यानंतर खेळपट्टीला कठीण म्हटले. तो म्हणाला की, “या खेळपट्टीवर आणखी 15-20 धावा करण्याची गरज होती. ही खूपच कठीण खेळपट्टी होती. मी पराभवाची जबाबदारी घेतो. मला अधिक उशीरपर्यंत फलंदाजी करायला पाहिजे होती. मी असे करू शकलो नाही.”
मात्र, राणाने यावेळी त्याच्या गोलंदाजांची प्रशंसा केली. तो म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांना श्रेय मिळाले पाहिजे. मला आशा आहे की, आगामी सामने आमच्यासाठी चांगले ठरतील. आम्ही त्यांचा विजय काही प्रमाणात टाळण्यात यशस्वी झालो. मात्र, पॉवरप्लेमध्ये दिल्लीने चांगली फलंदाजी केली. तिथूनच दिल्लीने सामना जिंकला. आम्हाला संघ म्हणून खेळण्याची गरज आहे. आम्ही आज ज्याप्रकारे गोलंदाजी केली, तशीच जर करत राहिलो, तर आमच्यासाठी गोष्टी चांगल्या होतील. आम्ही सर्व गोष्टींचा मार्ग काढत चांगले पुनरागमन करू शकतो.”
प्ले-ऑफचा मार्ग होऊ शकतो कठीण
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाला फक्त 2 विजय मिळवण्यात यश आले. मात्र, उर्वरित 4 सामन्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. जर कोलकाता संघ पुढील 2 किंवा 3 सामने जिंकण्यात यश मिळवू शकला नाही, तर त्यांच्यासाठी प्ले-ऑफच्या शर्यतीत राहणे खूपच कठीण होईल. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघ सहाव्या सामन्यात हंगामातील पहिला विजय मिळवण्यात यशस्वी झाला. (skipper nitish rana blame himself for the kkr defeat against delhi capitals in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर उघडले दिल्लीच्या विजयाचे खाते! संघर्षपूर्ण सामन्यात केकेआरचा निसटता पराभव
केकेआरविरूद्ध बदलाच घेतोय कुलदीप! मागील तीन सामन्यांत नाईट रायडर्सना करून सोडलेय सळो की पळो