---Advertisement---

‘बाहेर बसून काहीही बोलतात, जर मी…’, 1 धावेवर बाद झालेल्या KKRच्या कर्णधाराचे टीकाकारांना प्रत्युत्तर

Nitish-Rana
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने 81 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या गोलंदाजांना झोडून काढण्याचं काम शार्दुल ठाकूर याने केले. दुसरीकडे, कर्णधार नितीश राणा याने सामन्यात फक्त 1 धाव करून तंबूचा रस्ता पकडला. त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. सामन्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधताना टीकाकारांची बोलती बंद केली. तो म्हणाला की, “बाहेर बसून बोलणे खूप सोपे असते.”

Paisa-Pani

खरं तर, केकेआरचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) याने आरसीबीविरुद्ध खास कामगिरी केली नाही. त्याला 1 धाव करून तंबूत परतावे लागले. त्याने पुढे येऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विकेट गमवावी लागला. त्याने अशी फलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर सडकून टीका झाली. त्यानंतर राणाने टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाला राणा?
सामन्यानंतर नितीश राणा म्हणाला की, “हे दुर्दैवी नव्हते. मी अशाप्रकारेच फलंदाजी करतो. बाहेर बसून काहीही बोलणे सोपे आहे. जर मी बाहेर बसून कुणाचाही सामना पाहतो, तर चूक केल्यानंतर कुणीही म्हणू शकते की, तू चूक केली आहे.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “हा माझा शॉट होता आणि मी नेहमीच अशाप्रकारे खेळतो. जर आम्ही आव्हानाचा पाठलाग करत असतो, तेव्हा मी मान्य केले असते की, माझा शॉट चुकीचा होता. मी मायकल ब्रेसवेलविरुद्ध आक्रमक खेळ करू इच्छित होतो आणि फिरकीविरुद्ध पहिल्या षटकात मोठे फटके मारायची इच्छा होती. जेणेकरून त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकले. आमची योजना हीच होती.”

कर्णधार म्हणून चांगली कामगिरी
आरसीबीविरुद्ध नितीशने खराब फलंदाजी केली असेल, पण त्याने कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय योग्य ठरले. त्याने पॉवरप्लेमधील 2 षटके फिरकीपटूंना टाकायला सांगितली. त्यात त्यांनी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांची विकेट घेतली. यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी आरसीबीवर दबाव टाकला. शेवटी केकेआरने आरसीबीला 127 धावांवर लोळवले.

https://twitter.com/IPL/status/1644033996085665793

अय्यर दुखापतग्रस्त
केकेआरचा खेळाडू श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त असल्यामुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. त्याच्या जागी केकेआरचे नेतृत्व नितीश राणा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. राणाच्या नेतृत्वात केकेआरने पहिला सामना गमावला, पण दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत 81 धावांनी मोठा विजय मिळवला. मात्र, नितीश राणा याला दोन्ही सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याने 24 धावा, तर दुसऱ्या सामन्यात 1 धाव करून बाद झाला. (skipper nitish rana gave befitting reply to his critics after win against rcb)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू तडकाफडकी मायदेशी रवाना! जाणून घ्या कारण
मुंबई इंडियन्सपेक्षाही जास्त ‘ही’ टीम उधळते चीअरलीडर्सवर पैसा, दुसऱ्या स्थानावर RCB

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---