---Advertisement---

भारतीय संघाचे कर्णधारपद मिळताच हे काय बोलून गेला पंत; म्हणाला, ‘चांगल्या परिस्थितीत आले नाही…’

On: बुधवार, जून 8, 2022 11:18 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रिषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आली आहे. कारण, केएल राहुल हा दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बुधवारी (दि. ०८ जून) पत्रकार परिषदेत पंतने हे पद मिळाल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला पंत?
यादरम्यान बोलताना रिषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला की, “ही शानदार भावना आहे. खूप चांगल्या परिस्थितीत नाही, पण त्याच्यात मी आनंदी आहे. मी बीसीसीआयला धन्यवाद देऊ इच्छितो की, त्यांनी मला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. मी याचा पूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. माझ्या सर्व हितचिंतकांना धन्यवाद, ज्यांनी माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील चढ-उतारांमध्ये नेहमीच माझी साथ दिली. मी हाच आधार बनवत माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या आयुष्याला प्रत्येक दिवशी चांगले बनवण्याचा प्रयत्न करेल.”

‘आयपीएलमधून नेतृत्व करण्यास मदत मिळाली’
“ही शानदार भावना आहे, विशेषत: आपण ज्या राज्यात राहतो तिथे संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे. माझ्या मते, आयपीएलमुळे मला नेतृत्व करण्यात मदत मिळाली. कारण, जेव्हा तुम्ही वारंवार हे करता, तेव्हा सुधारणा होते. मी त्यातीलच आहे, जो आपल्या चुकांमधून शिकतो आणि माझ्यामते येत्या काही दिवसांमध्ये मला यातून मदत होईल,” असेही पुढे बोलताना पंत म्हणाला.

‘फलंदाजी क्रमात जास्त छेडछाड नाही’
राहुलच्या दुखापतीमुळे फलंदाजी क्रमात प्रभाव पडेल का? असे विचारले असता, पंत म्हणाला की, “माझ्या मते फलंदाजी क्रमात सर्वाधिक छेडछाड होणार नाही. कारण, केएल राहुल डावाची सुरुवात करायचा. आमच्याकडे जास्त सलामीवीर नाहीत. आम्ही याबाबत काही काळानंतर चर्चा करू. माझ्या मते संघाच्या रूपात आम्हाला काही आव्हानांबद्दल विचार करायचा आहे, जे आम्ही संघाच्या रूपात मिळवू इच्छितो. शेवटी आमच्या डोक्यात विश्वचषक आहे आणि आम्ही त्याच्या तयारीला लागलो आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही पाहाल की, बदल होतील आणि आम्ही कशाप्रकारे क्रिकेट खेळतो.”

‘द्रविडकडून खूप काही शिकायला मिळाले’
राहुल द्रविड याच्या सोबत असण्याबाबत प्रश्न विचारला असता पंत म्हणाला की, “त्यांचे जवळ असणेच सर्वात चांगल्या गोष्टींपैकी एक आहे. मी १९ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसांमध्ये त्यांच्यासोबत काम केले. त्यानंतर मी भारतीय संघात त्यांच्यासोबत काम केले. खूप अनुभवही आहे. ते एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्याकडून खूप काही शिकायचे बाकी आहे.”

पंतची कारकीर्द
रिषभ पंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून ३० कसोटी सामने, २४ वनडे सामने आणि ४३ टी२० सामने खेळले आहेत. यापैकी कसोटीत त्याने ४०.८५च्या सरासरीने १९२० धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके झळकावली आहेत. तसेच, ९ अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. याव्यतिरिक्त वनडेत त्याने ५ अर्धशतकांसह ३२.५०च्या सरासरीने ७१५ धावा चोपल्या आहेत. तसेच, टी२०त त्याने २४.३९च्या सरासरीने ६८३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ अर्धशतके केली आहेत.

मानलं भावा! लग्नाच्या ७ दिवसानंतर चेन्नईचा १४ कोटींचा हुकमी एक्का मैदानात परतला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---