भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी (दि. 22 मार्च) तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा चमकला. रोहितने या सामन्यात छोटेखाणी खेळी केली, पण त्या खेळीतही त्याने भीमपराक्रम केला. तो अशी कामगिरी करणारा आठवा भारतीय खेळाडू बनला. चला तर रोहितच्या पराक्रमाविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने 49 षटकात सर्व विकेट्स गमावत 269 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) सलामीला उतरले. यावेळी रोहितने 17 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांचा पाऊस पाडत 30 धावा केल्या. यासह त्याने खास विक्रम नावावर केला.
या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर आशियात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा विक्रम नोंदवला गेला. सामन्यात फलंदाजीला उतरण्यापूर्वी रोहितच्या नावावर 9996 धावा होत्या. मात्र, त्याने 4 धावा करताच त्याच्या 10000 धावा पूर्ण झाल्या. रोहितच्या 30 धावांमुळे आता त्याच्या आशियामध्ये एकूण 10026 आंतरराष्ट्रीय धावा झाल्या आहेत.
आशियात सर्वाधिक आंतराष्ट्रीय धावा करणारे 8 भारतीय
21741- सचिन तेंडुलकर
14685 – विराट कोहली
13497 – राहुल द्रविड
12155 – वीरेंद्र सेहवाग
10840 – एमएस धोनी
10709 – सौरव गांगुली
10558 – मोहम्मद अझरुद्दीन
10026 – रोहित शर्मा*
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील रोहित शर्मा कामगिरी
ऑस्ट्रेलिया संघ 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आहे. यातील कसोटी मालिकेत रोहित शर्मा हा सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज आहे. त्याने 4 सामन्यातील 6 डावात फलंदाजी करताना 40.33च्या सरासरीने 242 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितच्या नावावर एक शतकाचाही समावेश आहे.
दुसरीकडे, वनडे मालिकेत रोहित फक्त 2 सामने खेळला. पहिल्या सामन्यात तो वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकला नव्हता. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या याने संघाचे नेतृत्व करत विजय मिळवला होता. त्यानंतर रोहित दुसऱ्या सामन्यात संघात परतला. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात मिळून 21.50च्या सरासरीने 43 धावा केल्या. यातील 30 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (skipper Rohit Sharma becomes the 8th Indian to complete 10000 runs in Asia in International cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: कुलदीपच्या ‘त्या’ कृत्यामुळे रागाने लाल झाला कॅप्टन रोहित, लाईव्ह सामन्यात सर्वांसमोर केला बाजार
हार्दिक-कुलदीपच्या जलव्यानंतर ऑस्ट्रेलियाची झुंज! मालिका विजयासाठी टीम इंडियासमोर 270 धावांचे आव्हान