---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर सूर्या ‘या’ 3 भारतीयांवर नाराज; म्हणाला, ‘तुम्हाला एवढंच सांगतो, लय…’

On: शुक्रवार, नोव्हेंबर 24, 2023 10:11 AM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

INDvsAUS 1st T20I: गुरुवारपासून (दि. 23 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने अखेरच्या षटकात 2 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हा विजय मिळवल्यानंतर कर्णधार सूर्या खुश दिसला. मात्र, त्याने 3 खेळाडूंना ताकीद दिली.

काय म्हणाला सूर्या?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघातील पहिल्या टी20 सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खूपच खुश झाला. कर्णधार म्हणून भारताने त्याच्या नेतृत्वाखाली मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सामन्यानंतर त्याने खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली. विशेषत: रिंकू सिंग (Rinku Singh) याच्यावर. तो म्हणाला, “माझ्या नेतृत्वाची यापेक्षा चांगली सुरुवात होऊच शकत नव्हती. सामन्याच्या सुरुवातीला दबाव होता, पण संपूर्ण संघाने चांगले प्रत्युत्तर दिले.”

पुढे बोलताना सूर्या म्हणाला, “माझ्यासाठी ही खूपच सन्मानाची बाब आहे की, मी भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या डावात मी खेळाडूंना हेच म्हणालो की, मैदानात थोडेसे दव पाहायला मिळू शकतात. मैदान छोटे आहे. गोलंदाजीदरम्यान आम्ही अंदाज लावला होता की, जवळपास 230 धावा बनू शकतात. फक्त आपला खेळ खेळा. आनंद आहे की, आम्ही आमचे काम चोख पार पाडले.”

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “इशान आणि माझ्यात ही योजना तयार होती की, आव्हान पाहायचे नाही, फक्त 10 षटके टिकून राहायचे. ही योजना शेवटपर्यंत आमच्या कामी आली. सामन्यादरम्यान आम्हाला चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. अखेरीस अक्षर, अर्शदीप आणि रवीला हेच म्हणेल की, खेळ जास्त ताणू नका. रिंकू संघात आल्यानंतर सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. हीच त्याची खासियत आहे. मुकेशचे प्रदर्शन प्रशंसनीय आहे. त्याने अखेरच षटक चांगले टाकले.”

https://twitter.com/BCCI/status/1727743353947885587?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1727743353947885587%7Ctwgr%5E043a1784b88521a549dbdcb05b2ebccfa08e4dd3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fsuryakumar-yadav-not-happy-these-3-players-axar-patel-arshdeep-singh-ravi-bishnoi-india-vs-australia%2F455908%2F

सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 208 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून जोश इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावांची झंझावाती खेळी केली होती. त्याच्या खेळीत 8 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाच्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सूर्यकुमार यादव याच्या 80, इशान किशनच्या 52 आणि रिंकूच्या नाबाद 22 धावांच्या जोरावर 19.5 षटकात 8 विकेट्स गमावत 209 धावा केल्या. तसेच, हा सामना भारताने 2 विकेट्सने खिशात घातला. (skipper suryakumar yadav not happy these 3 players india vs australia)

हेही वाचा-
‘या’ भारतीय खेळाडूच्या लग्नाचा उडाला बार, स्वातीच्या प्रेमात झाला क्लीन बोल्ड; वाचा कोण आहे तो
रिंकू द फिनिशर! शेवटच्या चेंडूवर षटकार मारून ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---