पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत ४८७ वर सर्वबाद झाल्यानंतर श्रीलंकेची पहिली विकेट तिसऱ्याच षटकात गेली. श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरांगा ५ धावा करून तंबूत परतला आहे.
भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फटका मारताना त्याच्या बॅटचा एज लागून चेंडू यष्टीरक्षक वृध्दिमान साहाच्या हातात गेला. पंचांकडे आपिल केल्यानंतर पंचानी त्याला बाद दिले. पण थरांगाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. रीप्ले मध्ये स्पष्ट दिसले की चेंडू बॅट ला लागून गेला आहे आणि आता श्रीलंकेला या दिवसात परत रीव्हिव मिळणार नाही.
थरंगाचा खराब फॉर्म ही या मालिकेतील श्रीलंकेसाठीची एक मोठी अडचण ठरली आहे. भारताच्या एवढ्या मोठ्या धावसंख्येच्या श्रीलंका जितकी जवळ जाऊ शकेल तेवढे श्रीलंकेसाठी चांगले राहील.