पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत ४८७ वर सर्वबाद झाल्यानंतर श्रीलंके दोंन्ही सलामीवीर लगेचच तंबूत परतले आहेत, उपुल थरांगा नंतर लगेचच मागील सामन्यात श्रीलंकेचा शतकवीर करुणारत्ने बाद झाला आहे. करुणारत्ने १५ चेंडूत फक्त ४ धावा करून बाद झाला आहे.
भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेच ही विकेट घेतली आहे. त्याच्या गोलंदाजीवर फटका मारताना करुणारत्नेच्या बॅटचाकड लागला आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साहाने पुढे झेप घेत एक सुंदर झेल पकडला. मैदानावरील पंचानी झेल नीट घेतला आहे का नाही हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. यष्टीरक्षक साहाने चेंडू मैदानाला न स्पर्श करता झेल घेतला आहे हे तिसऱ्या पंचानी रिप्ल्य बघून मैदानावरीलवरील पंचांना सांगितले.
करुणारत्ने हा श्रीलंकेचा एकमेव फलंदाज होता ज्याने या मालिकेत श्रीलंकेकडून चांगला खेळ केला होता. आता तो बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजीच्या मधल्या फळीतून श्रीलंकेला चांगली खेळीची अपेक्षा असेल. आता श्रीलंकेची स्तिती २८ धावांवर २ बाद अशी आहे.